राष्ट्रीय

सोने विक्रमी ६८,४२० रुपयांवर; दिल्लीत सोने १,०७०, तर चांदी १,१२० रुपयांनी वधारली

Swapnil S

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सोमवारी सोन्याचा भाव १,०७० रुपयांनी वाढून ६८,४२० रुपये प्रति १० ग्रॅम या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, सोमवारी जागतिक बाजारात सोन्यामध्ये तेजी आली. त्याचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावर झाला. मागील व्यवहारात सोन्याचा भाव ६७,३५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. दरम्यान, चांदीचा भावही १,१२० रुपयांनी वाढून ७८,५७० रुपये किलो झाला. मागील व्यवहारात तो ७७,४५० रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करण्याच्या निर्णयाजवळ येत असल्याने सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे सराफा किमतीत वाढ होत आहे. याशिवाय, मजबूत चिनी मागणीमुळे मौल्यवान धातूच्या किमती वाढल्या आहेत, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे रिसर्च ॲनालिस्ट दिलीप परमार म्हणाले.

दरम्यान, एमसीएक्सवरील फ्युचर्स ट्रेडमध्ये सोन्याचा जूनचा करार ९७८ रुपयांनी वाढून ६८,६७९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. चांदीचा मे करार ७६३ रुपयांनी वाढून ७५,८११ रुपये प्रति किलो झाला. परदेशातील बाजारात, स्पॉट कॉमिक्स सोन्याचा भाव प्रति औंस २,२६५.७३ अमेरिकन डॉलर इतका वाढला आणि शेवटचा दर २,२५७.१० अमेरिकन डॉलर प्रति औंस झाला.

परदेशातील फ्युचर्समध्ये सोन्याचा भाव २,२८० अमेरिकन डॉलर प्रति औंस आणि एमसीएक्स फ्युचर्सवर ६९,४८७ रुपये प्रति औंसपेक्षा जास्त आहे, कारण अपेक्षित यूएस वाढ डेटा आणि २.५ टक्क्यांपेक्षा जास्त महागाई राहिल्यामुळे फेडरल रिझर्व्हच्या जूनमधील बैठकीत अपेक्षित दर कपातीबद्दल चिंता निर्माण झाली आहे.

चांदी २५.१३ अमेरिकन डॉलर प्रति औंसवर होती. मागील सत्रात हा दर २४.५५ डॉलर प्रति औंसवर बंद झाला होता. मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स (पीएमआय) सह प्रमुख यूएस डेटा सोमवारी जारी केला जाईल, जो फेडरल रिझर्व्हच्या चलनविषयक धोरणाच्या दृष्टिकोनासाठी पुढील दिशा देईल, असे प्रवीण सिंग, असोसिएट व्हीपी, चलने आणि कमोडिटीज, बीएनपी परिबा, शेअरखान म्हणाले.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

मोदींच्या बुलडोझरच्या वक्तव्याला इंडिया आघाडीचा आक्षेप; निवडणूक आयोगाने मोदींवर कारवाई करावी - खर्गे