सोने-चांदी बाजारात मोठी घडामोड? अमेरिकी रोजगार आकडेवारी, इराणमधील तणावाचा परिणाम जाणवणार संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

सोने-चांदी बाजारात मोठी घडामोड? अमेरिकी रोजगार आकडेवारी, इराणमधील तणावाचा परिणाम जाणवणार

सोन्याच्या दरात ६,००० रुपयांपेक्षा जास्त घसरण झालेल्या धक्कादायक आठवड्यानंतर, कमॉडिटी बाजार सप्टेंबर महिन्यात प्रवेश करत आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : सोन्याच्या दरात ६,००० रुपयांपेक्षा जास्त घसरण झालेल्या धक्कादायक आठवड्यानंतर, कमॉडिटी बाजार सप्टेंबर महिन्यात प्रवेश करत आहे. अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारी, भू-राजकीय तणाव केंद्रस्थानी आल्यामुळे व्यापारी बाजारात पुन्हा एकदा मोठ्या चढ-उतारांसाठी तयार होत आहेत, असे विश्लेषकांनी सांगितले.

भारतासह प्रमुख अर्थव्यवस्थांचे मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस पीएमआय आकडेवारी यावर गुंतवणूकदारांचे लक्ष असेल. याशिवाय युरोझोन आणि जर्मनीतील महागाईची आकडेवारी तसेच आठवड्याच्या शेवटी येणारी अमेरिकेची नॉन-फार्म पेरोल आकडेवारी यावरही बारकाईने लक्ष ठेवले जाईल, असे त्यांनी सांगितले.

मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजवर ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोन्याचे फ्युचर्स गेल्या आठवड्यात ६,१५७ रुपये म्हणजेच ३.८ टक्क्यांनी घसरून १.५६ लाख रुपये प्रति १० ग्रॅमवर आले, तर सप्टेंबर कॉन्ट्रॅक्टसाठी चांदीचे फ्युचर्स ९,८९३ रुपये म्हणजेच ४ टक्क्यांनी घसरून २.३६ लाख रुपये प्रति किलोग्रामवर आले.

आंतरराष्ट्रीय बाजारात, डिझेंबर डिलिव्हरीसाठी कॉमेक्स गोल्ड फ्युचर्स १५०.७ डॉलर म्हणजेच ३.२ टक्क्यांनी घसरून ४,६८०.६ डॉलर प्रति औंसवर बंद झाले. चांदीचे फ्युचर्स २.५६ डॉलर म्हणजेच ३.६४ टक्क्यांनी घसरून ६७.७८ डॉलर प्रति औंसवर आले.

भू-राजकीय घडामोडींमुळे अनिश्चितता आणखी वाढू शकते. व्यापारी अमेरिका-इराण तणावावर लक्ष ठेवणे सुरू ठेवतील, तर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील घडामोडी कच्च्या तेलाच्या किमती आणि महागाईच्या अपेक्षांसाठी महत्त्वाच्या राहतील.

  • एलकेपी सिक्युरिटीजचे कमॉडिटी आणि करन्सीचे व्हीपी रिसर्च ॲनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, हा आठवडा चढ-उतारांचा राहण्याची शक्यता आहे. कारण बाजारातील घटक सप्टेंबरमधील फेडरल रिझर्व्हच्या धोरणातील संभाव्य बदलांचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करतील. गेल्या आठवड्यात एमसीएक्स गोल्डमध्ये घसरण झाली. सोने प्रति १० ग्रॅम १.६३ लाख रुपयांवरून १.५६ लाख रुपयांपर्यंत खाली आले. यामुळे आठवड्याच्या उच्चांकावरून ६ हजारांपेक्षा जास्त घसरण झाली आणि आठवड्याचा शेवट ३ टक्क्यांपेक्षा जास्त नकारात्मक झाला, असे ते म्हणाले.

  • जेएम फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष (कमॉडिटी आणि करन्सी रिसर्च) प्रणव मेर म्हणाले की, फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष केविन वॉर्श यांच्या भाषणानंतर विक्रीचा दबाव वाढला. महागाई, आर्थिक धोरणावरील वक्तव्यामुळे बुलियन बाजारात नफा वसुली सुरू झाली. नवीन महिन्यात बाजार अमेरिकेच्या कामगार बाजारातील संकेतांवर लक्ष ठेवेल. यामध्ये नॉन-फार्म पेरोल, बेरोजगारीची आकडेवारी, एडीपी नॉन-फार्म एम्प्लॉयमेंट चेंज यांचा समावेश आहे, असे मेर यांनी म्हणाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पेढा, पनीरसह मिठाईही महागणार; दक्षिण मुंबईत म्हशीचे दूध ११२ रु. लिटर

देशभरात साखरेचे दर चढेच; किरकोळ बाजारात भाव ₹६० च्या पार, केंद्र सरकारने अनेक पावले उचलूनही साखर कडूच

मुंबई पोलिसांच्या घोडदळ पथकासाठी १.२७ कोटींचा निधी मंजूर; ३८ पोलिसांचे पथक तैनात, मुंबई पोलिसांचे बळ वाढणार

Mumbai : वाकोला नदीजवळच संरक्षक जाळ्या बसवणार; पालिका पावणेदोन कोटी खर्च करणार

Mumbai : नारळाच्या झाडांना संरक्षण जाळ्या बसवा! पालिका आयुक्त, उद्यान अधीक्षकांना मकरंद नार्वेकर यांचे पत्र