राष्ट्रीय

अश्लील, बेकायदेशीर मजकूर हटवा, सरकारचे ‘एक्स’ला निर्देश

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील सर्व अश्लील आणि बेकायदेशीर मजकूर हटवण्याचे निर्देश सरकारने शुक्रवारी ‘एक्स’ला कडक नोटीस बजावत दिले आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील सर्व अश्लील आणि बेकायदेशीर मजकूर हटवण्याचे निर्देश सरकारने शुक्रवारी ‘एक्स’ला कडक नोटीस बजावत दिले आहेत.

विशेष ‘ग्रोक’ या एआय ॲॅपद्वारे तयार होणारा किंवा प्रसारित होणारा मजकूर हटवण्यात यावा, अन्यथा कायद्यानुसार कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा सरकारने दिला आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० तसेच माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ अंतर्गत असलेल्या कायदेशीर दक्षतेच्या जबाबदाऱ्या पाळण्यात अपयश आल्याबद्दल ‘एक्स’च्या भारतातील कामकाजासाठी नियुक्त मुख्य अनुपालन अधिकाऱ्याला नोटीस बजावली आहे. कायद्यांचे उल्लंघन करून आधीच तयार केलेला किंवा प्रसारित केलेला सर्व मजकूर तत्काळ हटवावा किंवा त्यावर प्रवेश बंद करावा. हे सर्व आयटी नियम, २०२१ मध्ये ठरवून दिलेल्या कालमर्यादेत, कोणत्याही प्रकारे पुराव्याची हानी न करता, काटेकोरपणे केले जावे, असे आदेशात म्हटले आहे.

BMC Election : मुंबईच्या आखाड्यात ८४ प्रभागांत तिरंगी; ११८ ठिकाणी चौरंगी लढती

Zilla Parishad Election Maharashtra : आज जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा?

भाजपकडून अजितदादांची कोंडी; सावरकरांचे विचार मानावेच लागतील!

छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते! भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांने तोडले तारे; वादग्रस्त विधानाने महाराष्ट्रात संताप

अजब! भाजपने धरला काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात; अंबरनाथमध्ये भाजपसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत, शिवसेना विरोधी बाकावर