संग्रहित छायाचित्र  
राष्ट्रीय

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासावर अधिक देखरेख ठेवणे आवश्यक नसल्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठविली असून राज्य सरकारकडे उत्तर मागितले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासावर अधिक देखरेख ठेवणे आवश्यक नसल्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठविली असून राज्य सरकारकडे उत्तर मागितले आहे.

या हत्येचा तपास सुरुवातीला पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) केला होता. परंतु, नंतर २०२२ मध्ये तो महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात आला. उच्च न्यायालय २०१६ पासून तपासावर देखरेख करत होते. तपास यंत्रणा नियमितपणे तथ्यात्मक स्थिती अहवाल सादर करत होत्या.

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, उच्च न्यायालयाने ३ ऑगस्ट २०२२ रोजी मोठ्या कटाचा उलगडा करण्यासाठी आणि फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास एसआयटीकडून एटीएसकडे हस्तांतरित केला होता, हे खंडपीठाने विचारात घेतले नाही.

या याचिकेत म्हटले आहे की, प्रकरण हस्तांतरित झाल्यानंतर एटीएसने तपासात कोणतीही महत्त्वपूर्ण प्रगती केली नसली तरी, तपासाचे निरीक्षण करणे आवश्यक नाही, कारण एटीएसचा मुख्य उद्देश फक्त फरार आरोपींचा शोध घेणे आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. एटीएसचा तपास पूर्ण होईपर्यंत तपासाचे निरीक्षण सुरू ठेवावे, ही त्यांची विनंती उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

नोटीस जारी करा

न्या. एम. एम. सुंदरेश आणि एन. कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठाने १ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारकडून उत्तर मागितले. उच्च न्यायालयाच्या २ जानेवारीच्या आदेशाविरुद्ध पानसरे यांची कन्या आणि सुनेकडून ही याचिका दाखल करण्यात आली. नोटीस जारी करावी, असे खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे. कॉ. गोविंद पानसरे आणि त्यांची पत्नी उमा यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूर शहरात मॉर्निंग वॉकच्यावेळी गोळीबार करण्यात आला. जखमी गोविंद पानसरे यांचा घटनेच्या चार दिवसांनी २० फेब्रुवारी २०१५ रोजी मृत्यू झाला तर त्यांची पत्नी हल्ल्यातून सुदैवाने बचावल्या.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

Mumbai : २३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८२६ कोटींची मान्यता