राष्ट्रीय

सरकारी चणाडाळ ६० रुपये किलो

सरकारकडे चण्याचा मोठा साठा असून त्याचे रुपांतर चणा डाळीत केले जाणार आहे.

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : देशातील वाढती महागाई लक्षात घेता सरकारने आता पावले उचलायला सुरुवात केली आहे. ‘भारत डाळ’ या ब्रँड अंतर्गत केंद्र सरकारने अनुदानित सरकारी चणाडाळ आणली आहे. ही डाळ ६० रुपये किलोने मिळणार आहे. केंद्रीय खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत ही डाळ बाजारात आणण्यात आली.

या चणाडाळीचे ३० किलोचे पोते प्रति ५५ रुपये दराने मिळणार आहे. ही अनुदानित चणाडाळ दिल्ली-एनसीआर भागात नाफेडच्या दुकानातून मिळणार आहे. सरकारकडे चण्याचा मोठा साठा असून त्याचे रुपांतर चणा डाळीत केले जाणार आहे.

लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक; योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार - अदिती तटकरे

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मनसेचा आज ट्रॅफिक मार्च; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

इराणमध्ये नोकरी शोधताय? तर, सावधान! भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा

बेताल वक्तव्यावरून वाद; पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून नोंदविला आक्षेप