राष्ट्रीय

केंद्राने दोन वर्षांनंतर प्रथमच नैसर्गिक वायूच्या दरात केली कपात; CNG, PNG स्वस्त होणार!

द्र सरकारने दोन वर्षांनंतर प्रथमच नैसर्गिक वायूच्या किमती कमी केल्या आहेत. त्यामुळे लवकरच सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात होणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्र सरकारने दोन वर्षांनंतर प्रथमच नैसर्गिक वायूच्या किमती कमी केल्या आहेत. त्यामुळे लवकरच सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात होणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील ‘ओएनजीसी’ला लिलावाशिवाय वाटप केलेल्या वारसा किंवा जुन्या क्षेत्रांमधून मिळणाऱ्या नैसर्गिक वायूची किंमत ६.७५ डॉलरवरून ६.४१ डॉलर प्रति दशलक्ष ब्रिटिश थर्मल युनिट्स (एमएमबीटीयू) पर्यंत कमी करण्यात आली आहे. एप्रिल २०२३ मध्ये सरकारने अशा गॅसच्या किमतीसाठी नवीन फॉर्म्युला आणल्यानंतरची ही पहिलीच कपात आहे. या निर्णयामुळे इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड, महानगर गॅस लिमिटेड आणि अदानी-टोटल गॅस लिमिटेड आदी शहरी गॅस किरकोळ विक्रेत्यांना मोठा फायदा होईल.

सीएनजी, पीएनजीच्या दरात कपात शक्य

सरकारच्या निर्णयानंतर, ग्राहकांनाही मोठा फायदा मिळेल. तज्ज्ञांच्या मते, या कपातीमुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमती २ ते ३ रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video