Photo : X (@airnewsalerts)
राष्ट्रीय

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात वस्तू व सेवा करात (जीएसटी) मोठे बदल करण्याची घोषणा केली होती. आता जीएसटीबाबत धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या जीएसटी परिषदेची बैठक बुधवारी (दि.३) होणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात वस्तू व सेवा करात (जीएसटी) मोठे बदल करण्याची घोषणा केली होती. आता जीएसटीबाबत धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या जीएसटी परिषदेची बैठक बुधवारी (दि.३) होणार आहे. या बैठकीत दैनंदिन वापरातील लोण्यापासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंतच्या वस्तूंवरील जीएसटीचा दर कमी करण्याच्या उद्देशाने निर्णय होण्याची शक्यता आहे.

जीएसटी परिषदेची दोन दिवसीय बैठक बुधवारपासून सुरू होत आहे. यात जीएसटीचे टप्पे व कर बदलाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील या परिषदेत सर्व राज्यांचे अर्थमंत्री सहभागी होतील.

सरकारने जीएसटीमध्ये पुढील सुधारणा करण्याचे ठरवले आहे. त्यात विद्यमान १२ आणि २८ टक्के कर दर रद्द करून फक्त दोन दर ५ टक्के आणि १८ टक्के ठेवण्याची शिफारस केली.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश