X
राष्ट्रीय

हाथरस : गर्दीतच काही जणांनी विषारी घटक असलेले डबे उघडले; भोले बाबाच्या वकिलांचा दावा

हाथरस सत्संगच्या वेळी काही जणांनी विषारी घटकांनी भरलेले डबे गर्दीतच उघडल्याचे आपल्याला ती घटना पाहणाऱ्यांनी सांगितल्याचा दावा भोले बाबाचे वकील ए. पी. सिंह यांनी रविवारी केला.

Swapnil S

नवी दिल्ली : हाथरस सत्संगच्या वेळी काही जणांनी विषारी घटकांनी भरलेले डबे गर्दीतच उघडल्याचे आपल्याला ती घटना पाहणाऱ्यांनी सांगितल्याचा दावा भोले बाबाचे वकील ए. पी. सिंह यांनी रविवारी केला. भोले बाबाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे कारस्थान रचण्यात आले आणि तेच चेंगराचेंगरीमागील कारण आहे, असेही सिंह यांनी रविवारी येथे एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

घटनेचे साक्षीदार असलेल्यांनी आपल्याशी संपर्क साधला आणि १५-१६ जणांकडे विषारी घटक असलेले डबे होते आणि त्यांनी ते गर्दीतच उघडले, अशी माहिती आपल्याला दिली. शवविच्छेदन अहवाल आपण पाहिला आहे, जखमी झाल्यामुळे नव्हे तर गुदमरल्याने लोकांचा मृत्यू झाल्याचे त्यामध्ये म्हटले आहे, असेही सिंह यांनी सांगितले. या चेंगराचेंगरीमागे कारस्थान असून विषारी घटक घेऊन येणाऱ्या इसमांना तेथून पसार होणे शक्य व्हावे यासाठी तेथे काही गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या, याबाबत आमच्याकडे पुरावे असून ते सादर केले जातील, ही बाब आपण प्रथमच जाहीर करीत आहोत, असेही सिंह म्हणाले.

"धमकीची माहिती देऊनही..." ; खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्याप्रकरणी नातेवाईकांचा गंभीर आरोप

खोपोलीतील मंगेश काळोखेंच्या हत्येचा थरार; धक्कादायक CCTV फुटेज व्हायरल

पुण्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी; निवडणुकीच्या युती-आघाड्यांची नव्याने मांडणी

BMC Election : महायुतीचे २०७ जागांवर एकमत, २० जागांवर चर्चा सुरू

आरोपी बंडू आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात; हातात बेड्या, गळ्यात दोरखंड, घोषणाबाजी करत अर्ज भरायला गेला, पण...