राष्ट्रीय

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरण: मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Swapnil S

नोइडा : हाथरसमध्ये २ जुलै रोजी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकर हा दुर्घटना घडल्यानंतर दिल्लीला पसार झाला, मात्र शुक्रवारी रात्री उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तथापि, मधुकरने दिल्लीत पोलिसांसमोर शरणागती पत्करल्याचा दावा त्याचे वकील ए. पी. सिंह यांनी केला. हाथरस पोलिसांच्या विशेष दलाने मधुकर याच्या मुसक्या आवळल्याचे, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दिल्लीतील नजाफगड परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. मात्र सत्संगचा मुख्य सेवेकरी मधुकर याला अटक करण्यात आल्याचे अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही.

हाथरसमधील सिकंदर राव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या एफआयआरमध्ये केवळ मधुकर याच्याच नावाची आरोपी म्हणून नोंद करण्यात आली आहे. आम्ही काहीच चुकीचे केले नाही. त्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार नाही. आमचा गुन्हा काय आहे, मधुकर हा अभियंता असून त्याला हृदयविकार आहे. त्यामुळे उपचारासाठी तो दिल्ली येथे गेला होता, असा दावाही त्याच्या वकिलांनी केला.

Mumbai Local Mega Block Update : प्रवाशांनो लक्ष द्या...रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर ब्लॉक, जाणून घ्या डिटेल्स

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज Metro-3 चे उद्घाटन; अंतर्गत रिंग मेट्रो, ठाणे पालिकेच्या नवीन इमारतीचेही भूमिपूजन

पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार; पोलिसांकडून संशयित आरोपींचे स्केच जारी

निराधार दुर्गांची जीवनभरारी! बालगृहातील भगिनी ते अधीक्षिका; सांगलीच्या सपनाचा स्फूर्तिदायी प्रवास

इस्त्रायलचा खात्मा करणार; इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांची गर्जना