राष्ट्रीय

श्रीगंगानगरमध्ये ४८ अंश तापमान; उन्हाच्या झळांमुळे घराबाहेर पडणे कठीण

पावसाळा सुरू झाल्यानंतरही राजस्थानात सूर्य आग ओकत आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उन्हाच्या झळांमुळे लोकांना घरातून बाहेर पडणे नकोसे होऊ लागले आहे.

Swapnil S

जयपूर : पावसाळा सुरू झाल्यानंतरही राजस्थानात सूर्य आग ओकत आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उन्हाच्या झळांमुळे लोकांना घरातून बाहेर पडणे नकोसे होऊ लागले आहे.

उष्णतेने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. राजस्थानच्या श्रीगंगानगर शहराचे तापमान बुधवारी ४८ अंशांवर पोहचले होते. विशेष म्हणजे बाडमेर व जैसलमेरपेक्षा जास्त तापमान जयपूरमध्ये आहे. जैसलमेरमध्ये ४३.७ अंश, बाडमेर ४४.२ अंश, तर जयपूरमध्ये ४४.४ अंश तापमान नोंदले गेले.

जम्मूत ४४.४ अंश तापमान

जम्मूत ४४.४, सांबा ४६.८ अंश, उधमपूर ४२.४ अंश, रामबन ४१.९ अंश व राजौरीत ४०.२ अंश तापमान नोंदवले गेले आहे. हे तापमान सरासरी तापमानापेक्षा ५ ते ७ अंशांनी वाढले गेले.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video