एएनआय
राष्ट्रीय

हिंदू हा देशातील जबाबदार समाज; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

हिंदू समाज एकजूट होणे गरजेचे आहे. कारण हा देशातील जबाबदार समाज आहे. एकतेमध्ये विविधता सामील आहे असे हिंदू समाज मानतो, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी येथे केले.

Swapnil S

वर्धमान : हिंदू समाज एकजूट होणे गरजेचे आहे. कारण हा देशातील जबाबदार समाज आहे. एकतेमध्ये विविधता सामील आहे असे हिंदू समाज मानतो, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी येथे केले. पश्चिम बंगालमधील वर्धमान येथील साई ग्राऊंडमध्ये आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘तुम्ही केवळ हिंदू समाजावर लक्ष केंद्रित का करता? असा प्रश्न आम्हाला विचारला जातो. त्यावर भागवत म्हणाले की, हिंदू हा देशातील जबाबदार समाज आहे’. ज्या लोकांना संघाबाबत काहीही माहिती नसते. ते प्रश्न करतात की, संघाला काय करायचे आहे. संघाला हिंदू समाजाचे संघटन करायचे आहे. कारण हा समाज देशातील एक जबाबदार समाज आहे, असे ते म्हणाले.

भागवत पुढे म्हणाले की, भारत हा केवळ भूगोल नाही तर एक मूल्य व्यवस्था असलेला देश आहे. काहीजण या मूल्यांनुसार राहू शकले नाहीत. त्यांनी त्यांचा वेगळा देश बनवला. मात्र, ज्या लोकांनी भारतात राहून भारताचे तत्त्वज्ञान आपलेसे केले ते तत्त्वज्ञान म्हणजे हिंदू समाज होय. हा समाज जगातील विविधता अंगिकारून वाढतो आहे. आम्ही म्हणतो ‘विविधतेतून एकता’. मात्र, हिंदू समाजासाठी विविधता हीच एकता आहे, असे ते म्हणाले.

भारतात कोणीही सम्राट किंवा राजांची आठवण काढत नाही. मात्र, आपल्या पित्याचे वचन पूर्ण करण्यासाठी १४ वर्षांचा वनवास भोगणाऱ्या राजाची आठवण आजही काढली जाते, असे ते म्हणाले.

मूल्याचे पालन करतात ते हिंदू असून ते देशाच्या विविधतेतही एकजूट ठेवतात. दुसऱ्याला दु:ख देणाऱ्या कामात हिंदू सामील होत नाहीत. राज्यकर्ते, प्रशासक आणि महापुरुष आपली कामे करत असतात. पण, देशाची सेवा करायला समाजाला पुढे यावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

चांगल्या काळातही आव्हाने येतात!

चांगल्या काळातही आव्हाने येतात. मात्र, या आव्हानांचा सामना करायला आपण किती तयार आहोत, याची जाणीव आवश्यक आहे. काही मूठभर लोकांनी भारतावर राज्य केले. समाजात विश्वासघात होत असल्यानेच हे प्रकार घडले, असे ते म्हणाले.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, मुंबई पोलीस ठाम ; भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश