संग्रहित छायाचित्र पीटीआय
राष्ट्रीय

"पाकिस्तानी नागरिकांना शोधून तात्काळ परत पाठवा"; गृहमंत्री अमित शहांच्या सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना स्पष्ट सूचना

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून पाकिस्तानी नागरिकांविषयी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

Krantee V. Kale

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून पाकिस्तानी नागरिकांविषयी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. तुमच्या राज्यांमध्ये असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना शोधा आणि त्यांना तातडीने परत पाठवण्यासाठी आवश्यक पावले उचला, अशा स्पष्ट सूचना शहा यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिल्या.

दरम्यान, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीत पाकिस्तानवर कायदेशीर स्ट्राइक करण्यासाठी काही मोठे निर्णय घेतले आहेत. भारताने १९६० चा सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार स्थगित केलाय. तसेच, अटारी सीमा बंद केली आहे. यामार्गे आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना १ मे २०२५ पर्यंत यामार्गाने भारत सोडण्याचे आदेश दिलेत. याशिवाय, सार्क व्हिसा योजनेअंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना मिळालेला व्हिसा रद्द करुन त्यांना भारत सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’