जूनला संपलेल्या तिमाहीत घरांच्या किमतीत मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये तीन टक्के वाढ झाली आहे. मुंबईतील निवासी दर १८,८९६ रुपये प्रति चौ. फूट झाला असून आधी तो १८,२५९ रुपये होता. तर ठाण्यातील दर ६,३२५ रुपये प्रति चौ. फू. होता, जो पूर्वी ६,१६५ ६५ रुपये होता. तसेच पुण्यातील निवासी घरांचे दर ५,३४८ चौ. फू. झाले असून आधी ते ५,१८९ रुपये होता.
निवासी बाजारपेठेत विक्री वाढत असून गेल्या वर्षभरात किमतीत वाढ झाली आहे, असे समीर जासुजा, संस्थापक आणि एमडी, प्रॉपइक्विटी यांनी म्हटले आहे.
नऊ शहारात एप्रिल ते जून या तिमाहीत घरांच्या किमतीत सरासरी १५ टक्के वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये सर्वाधिक १५ टक्के दरवाढ झाली आहे, अशी माहिती डाटा ॲनालिटिक फर्म प्रॉपइक्विटीने म्हटले आहे.
जूनला संपलेल्या तिमाहीत चेन्नईमध्ये सरासरी किंमत १५ टक्के वाढून ६,७४४ प्रति चौ.फू. झाला असून वर्षभरापूर्वी हा दर ५८५५ रुपये होता. गुरुग्राममध्ये १२ टक्के घरांचे दर वाढून ११,५१७ चौ. फूट झाले असून मागील वर्षी तो १०,३१५ रुपये होता.
हैदराबादमध्ये १२ टक्के वधारुन घरांचा प्रति चौ. फू. दर ६,४७२ रु. झाला असून आधी तो ५,७६४ रुपये झाला. नोएडामध्ये घरांचा दर ९ टक्के वाढून ७,४११ चौ. फू. झाला असून यापूर्वी तो ६,७९१ रुपये जाला. बंगळुरुमध्ये घरांची किमतीत ८ टक्के वाढून ६,१९६ रुपये प्रति चौ.फू. झाली आहे. आधी हा दर ५,७६० प्रति. चौ. फू. होता. कोलकात्यात घरांच्या किमतीत सरासरी १ टक्का वाढ झाली आहे.