राष्ट्रीय

'खडूस बॉस'चा बदला! सेक्स चॅटिंगमध्ये फसवून पत्नीसह HR लाही पाठवले न्यूड फोटो

Swapnil S

'खडूस बॉस'ला धडा शिकवण्यासाठी त्याच्या कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी असा काही प्लॅन बनवला की त्याची झोपच उडाली. गुजरातच्या वडोदरा येथील ही घटना आहे. येथे बॉसच्या त्रासामुळे एका पुरुष व महिला कर्मचाऱ्याला नोकरी सोडावी लागली. त्यानंतर दोघांनी बदला घेण्याचे ठरवले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉसला हनीट्रॅपमध्ये अडकवले. त्यानंतर त्याचे नग्न फोटो मित्रमंडळी, नातेवाईकांसह, त्याच्या बायकोला तर पाठवलेच, शिवाय कंपनीच्या एचआरलाही पाठवले. तीन महिने हा सर्व प्रकार सहन केल्यानंतर पीडित बॉसने अखेर पोलिसांत तक्रार नोंदवली.

माहितीनुसार, समीर गुप्ता (बदललेले नाव) एका सॉफ्टवेअर कंपनीत प्रमोटर आहे. समीरकडून वारंवार होणाऱ्या अपमानाला, त्रासाला वैतागून पूजा आणि सुनील ( दोघांची बदललेली नावे) या कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली. तीन महिन्यांपूर्वी दोघांनी मिळून समीरला धडा शिकवण्याचे ठरवले. दोघांनी इंस्टाग्रामवर एका तरुणीच्या नावाने फेक अकाउंट बनवले. त्याद्वारे समीरला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि त्याच्याशी चॅटिंग सुरू केली.

नंतर समीरचा विश्वास संपादन करून दोघांनी त्याच्यासोबत अश्लील चॅटिंग करण्यास सुरूवात केली. काही न्यूड फोटो पॉर्न वेबसाईटवरून डाउनलोड करून त्यांनी समीरला पाठवले. मग, समीरलाही स्वतःचे न्यूड फोटो पाठवण्यास सांगितले. समीरनेही त्यांनी सांगितल्याप्रमाणे केले आणि स्वतःचे काही नग्न फोटो पाठवले. त्यानंतर अचानक त्या अकाउंटवरून चॅटिंग बंद झाली.

काही दिवसांनी पूजा आणि सुनीलने नग्न फोटो आणि सेक्स चॅटिंगचे स्क्रीनशॉट समीरला ईमेलद्वारे पाठवले. ते बघून समीर हादरला. सप्टेंबरमध्ये तेच फोटो आणि स्क्रीनशॉट दोघांनी समीरच्या कार्यालयातील एचआर डिपार्टमेंटलाही पाठवले. यावरच न थांबता त्यांनी समीरच्या पत्नीसह त्याच्या ऑफिसमध्येही ते फोटो पाठवले. हा छळ एवढ्यावरच संपला नाही. नोव्हेंबरमध्ये जेव्हा समीर एका शॉपिंग मॉलमध्ये गेला असता दोघांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याचे फोटो काढले. त्यानंतर तुझ्यावर आमची नेहमी नजर आहे असे दाखवत घाबरवण्यासाठी समीरला त्याचीच मॉलमधील छायाचित्रेही पाठवली.

अखेर वैतागून 10 दिवसांपूर्वी समीरने पोलिसांत तक्रार केल्यानंतर ब्लॅकमेलर्सचे गूढ उकलले आहे. हे कॉर्पोरेट शत्रुत्वाचे प्रकरण होते. आम्ही आवश्यक कायदेशीर पावले उचलली आहेत," असे हार्दिक मकाडिया, एसीपी (सायबर क्राईम), वडोदरा यांनी सांगितले. तथापि, तक्रारदार या प्रकरणाचा पुढील पाठपुरावा करू इच्छित नाही.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त