राष्ट्रीय

पतीचा शोध घेत फ्लॅटवर पोहोचली, दुसऱ्या महिलेसोबत पाहताच राडा; दोघींची तुफान हाणामारी, VIDEO

पतीचा शोध घेत फ्लॅटवर पोहोचलेल्या महिलेला पती दुसऱ्या महिलेसोबत दिसला. त्यानंतर दोघींमध्ये वाद होऊन तुफान हाणामारी झाली. या घटनेचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mayuri Gawade

सोशल मीडियावर अनेकदा छोट्या-मोठ्या वादांचे व्हिडीओ क्षणात व्हायरल होतात. आता ग्रेटर नोएडामधील असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. पतीचा शोध घेत फ्लॅटवर पोहोचलेल्या पत्नीला तिथे पती दुसऱ्या महिलेसोबत दिसला. यानंतर पत्नी आणि त्या महिलेमध्ये जोरदार वाद झाला आणि काही वेळातच दोघींमध्ये हाणामारी सुरू झाली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

पती न्यायालयात आला नाही, म्हणून पत्नीने शोध सुरू केला

ही घटना ग्रेटर नोएडा पश्चिममधील गौर सिटी-२ टाउनशिपमध्ये घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित पती-पत्नीमध्ये न्यायालयात कौटुंबिक वादाचे प्रकरण सुरू आहे. त्यामुळे दोघेही सध्या वेगवेगळे राहत होते.

७ ऑगस्ट रोजी या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी होती. दोघांनीही सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहायचे होते. मात्र, पती न्यायालयात पोहोचलाच नाही. त्यामुळे पत्नीने त्याचा शोध सुरू केला.

फ्लॅटवर पोहोचली अन् पती दुसऱ्या महिलेसोबत दिसला

पतीचा शोध घेत पत्नी गौर सिटी-२ मधील एका फ्लॅटवर पोहोचली. तिथे तिला पती एका महिलेसोबत दिसला. हे पाहिल्यानंतर पत्नीने त्या महिलेला याबाबत विचारणा केली.

सुरुवातीला दोघींमध्ये शाब्दिक वाद झाला. मात्र, काही वेळातच वाद वाढला आणि दोघींनी एकमेकींना मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे सोसायटीमध्ये एकच गोंधळ उडाला. आवाज ऐकून फ्लॅटबाहेर नागरिकांची गर्दीही जमली.

कोण होती ती दुसरी महिला?

या प्रकारानंतर दोन्ही बाजूंनी पोलिसांशी संपर्क साधला. चौकशीदरम्यान पोलिसांना समजले की, फ्लॅटमध्ये असलेली महिला ही संबंधित व्यक्तीची मैत्रीण आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ती महिला फ्लॅट रिकामा करत होती. सामान दुसरीकडे हलवण्यासाठी तिने त्या व्यक्तीला मदतीसाठी बोलावले होते. दोघे फ्लॅटमध्ये असतानाच त्याची पत्नी तिथे पोहोचली आणि त्यानंतर दोन्ही महिलांमध्ये वाद झाला.

पोलिसांकडे अधिकृत तक्रार नाही

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, दोन्ही बाजूंनी पोलिसांशी संपर्क साधला असला तरी अद्याप कोणत्याही पक्षाने अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

किंमत तीच, वजन कमी! कच्च्या मालाच्या किमतीतील वाढीमुळे कंपन्यांपुढे पर्याय

कोल्हापूरची हद्दवाढ गरजेची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

२०१५ पूर्वीच्या एकतर्फी मध्यस्थांच्या नेमणुका आपोआप रद्द ठरत नाहीत - मुंबई उच्च न्यायालय

पदवीदान समारंभात सरन्यायाधीशांच्या उपस्थितीवर नाराजी; लॉ विद्यापीठाच्या ४५० विद्यार्थ्यांचा CJI सूर्य कांत यांना विरोध

भिवंडीत १७ वर्षीय तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू