राष्ट्रीय

तामिळनाडूमध्ये हवाई दलाचे विमान कोसळले; पायलटच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला, चौकशीचे आदेश

तामिळनाडूमधील तांबरम हवाई तळाजवळ शुक्रवारी (दि. १४) दुपारी घडलेल्या विमान अपघाताने मोठी खळबळ उडाली. भारतीय हवाई दलाचे पिलाटस पीसी-७ एमके २ हे ट्रेनर विमान नियमित उड्डाण मोहिमेदरम्यान कोसळले.

नेहा जाधव - तांबे

तामिळनाडूमधील तांबरम हवाई तळाजवळ शुक्रवारी (दि. १४) दुपारी घडलेल्या विमान अपघाताने मोठी खळबळ उडाली. भारतीय हवाई दलाचे पिलाटस पीसी-७ एमके २ हे ट्रेनर विमान नियमित उड्डाण मोहिमेदरम्यान कोसळले. मात्र, पायलटच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास हे विमान प्रशिक्षण उड्डाणासाठी रवाना झाले होते. नवीन पायलटला प्राथमिक उड्डाण कौशल्यांचे प्रशिक्षण देताना सुमारे २ वाजण्याच्या सुमारास विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला. पायलटने तत्काळ आपत्कालीन प्रक्रिया राबवून इमर्जन्सी लँडिंगचा प्रयत्न केला. मात्र, अचानक नियंत्रण सुटल्याने विमान जमिनीवर कोसळले.

निर्जन परिसरात विमान कोसळले

विमान तांबरम हवाई तळाच्या हद्दीपासून थोड्याच अंतरावर असलेल्या निर्जन जंगल भागात कोसळल्याने हानी झाली नाही. विमानाला आग लागली नाही, तसेच पायलट वेळेत ‘इजेक्ट’ होऊन बाहेर पडल्याने त्याचे प्राण वाचले. त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी तातडीने हवाई दलाचे आपत्कालीन पथक आणि स्थानिक पोलीस पोहोचले.

हवाई दलाची चौकशी सुरू

भारतीय हवाई दलाने या दुर्घटनेचा सखोल तपास करण्यासाठी ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश दिले आहेत. विमानातील तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला, तसेच उड्डाण प्रक्रियेत कोणती अडचण निर्माण झाली, याचा तपास सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, “पायलटने अत्यंत दक्षता आणि तत्परता दाखवत आपत्कालीन नियमांचे पालन केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.”

पीसी–७ पिलाटसचे महत्त्व

भारतीय हवाई दलात पिलाटस पीसी–७ एमके–२ हे विमान कॅडेट्सच्या प्राथमिक प्रशिक्षणासाठी वापरले जाते. या विमानाद्वारे पायलटांना मूलभूत उड्डाण, नियंत्रण आणि आपत्कालीन प्रक्रियांचे प्रशिक्षण दिले जाते.

Bihar Election Results 2025 Live Updates: एनडीए २०० च्या पार; "ही ज्ञानेश कुमार यांची जादू"; काँग्रेसच्या भूपेश बघेल यांची टीका

Assembly Bypolls Result 2025 : अंतापाठोपाठ जुबली हिल्समध्येही काँग्रेसचा दमदार विजय; बघा अन्य ६ जागांवर कोणाची बाजी?

सुवर्णकाळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन; ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Red Fort Blast : दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणी मोठी कारवाई; मास्टरमाईंडचे घर सुरक्षा दलाने उडवले

CSMT : लाल बॅगेचं गूढ उलगडलं! कोणताही धोका नाही, बॅगेत आढळल्या 'या' वस्तू