राष्ट्रीय

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी न्यायाधीशांविरुद्ध महाभियोग नोटीस

विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य करणारे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शेखरकुमार यादव यांच्यावर महाभियोग चालविण्यासाठी विरोधी पक्षांच्या विविध सदस्यांनी शुक्रवारी राज्यसभा सरचिटणीसांकडे नोटीस दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य करणारे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शेखरकुमार यादव यांच्यावर महाभियोग चालविण्यासाठी विरोधी पक्षांच्या विविध सदस्यांनी शुक्रवारी राज्यसभा सरचिटणीसांकडे नोटीस दिली.

या नोटिशीवर विरोधी पक्षांच्या ५५ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामध्ये कपिल सिब्बल, दिग्विजयसिंह, विवेक तन्खा, मनोजकुमार झा आणि साकेत गोखले आदींचा समावेश आहे. या खासदारांनी राज्यसभेच्या सरचिटणीसांची भेट घेऊन त्यांच्याकडे महाभियोगाबाबतची नोटीस सुपूर्द केली. सर्वोच्च न्यायालयाने न्या. शेखरकुमार यादव यांच्या वक्तव्याची दखल घेत त्याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून त्याबाबतचा अहवाल मागविला आहे.

Delhi Protest : अभिजीत दिपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका

Mumbai : दसरा मेळाव्यासाठी दादरमधील वाहतुकीत मोठे बदल! २० ऑक्टोबरला 'हे' रस्ते बंद; पर्यायी मार्ग, पार्किंगची व्यवस्था जाणून घ्या

Mumbai : आता हापूस आंबे, काजू वर्षभर उपलब्ध होणार; २ हजार टन क्षमतेच्या शीतगृहाची निर्मिती

नाशिक जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीसह विक्रीवर बंदी; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आदेश

मीरा-भाईंदरमध्ये बसभाड्याचा झटका! साध्या बसच्या भाड्यात वाढ; एसी बस स्वस्त