राष्ट्रीय

इंडिया आघाडीला सनातन धर्म पुसून टाकायचा आहे : ज्योतिरादित्य शिंदे

नवशक्ती Web Desk

ग्वाल्हेर : काँग्रेसप्रणीत विरोधी इंडिया आघाडी महात्मा गांधींचा सनातन धर्म पुसून टाकू इच्छित आहे. पण त्यांनी व्यापक जनक्षोभ पाहून भोपाळमधील नियोजित रॅली रद्द केली, असा आरोप केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी रविवारी केला. विश्वकर्मा जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ते ग्वाल्हेरमध्ये आले होते.

विरोधक आघाडीला सनातन धर्म नष्ट करायचा आहे, देशभरात भ्रष्टाचार पसरवायचा आहे, घराणेशाहीचे राजकारण करायचे आहे आणि तुष्टीकरण करायचे आहे. विरोधी आघाडीने महात्मा गांधींचा सनातन धर्म पुसून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, त्यांना प्रचंड जनक्षोभाचा सामना करावा लागेल, असा आरोप त्यांनी केला.

चौदा टेलिव्हिजन अँकरच्या शोवर बहिष्कार घालण्याच्या इंडिया आघाडीच्या निर्णयाबद्दल विचारले असता शिंदे म्हणाले की, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाविरुद्ध भेदभाव करणे काँग्रेसच्या डीएनएमध्ये आहे. काँग्रेसने वेळोवेळी संविधानाचा नाश केला आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस