भारताची निर्यातीची टोपली भलीमोठी...; आम्रपाली आंबे, प्रीमियम चेरी, फ्रोजन फ्रेंच फ्राइजला मिळाली नवी बाजारपेठ 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

भारताची निर्यातीची टोपली भलीमोठी...; आम्रपाली आंबे, प्रीमियम चेरी, फ्रोजन फ्रेंच फ्राइजला मिळाली नवी बाजारपेठ

देशातील निर्यातीचा विस्तार अधोरेखित करत, जुलै महिन्यात कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या अनेक नवीन उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ग्राहक मिळवून देण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाने सहकार्य केले आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : देशातील निर्यातीचा विस्तार अधोरेखित करत, जुलै महिन्यात कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या अनेक नवीन उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ग्राहक मिळवून देण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाने सहकार्य केले आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.

आम्रपाली आंबे, प्रीमियम अरेको चेरी, फ्रोजन फ्रेंच फ्राइज, आले, अननस, मध, जीआय-टॅग प्राप्त लाकाडोंग हळद, सेंट्रोज प्लम्स, पुरबी आइसक्रीम, नीलम व तोतापुरी आंबे आणि फ्लेव्हर्ड मखाणा यांसारख्या विविध उत्पादनांची सिंगापूर, इराक, यूएई (संयुक्त अरब अमिराती), कॅनडा, भूतान आणि मालदीव यांसारख्या देशांमध्ये यशस्वी निर्यात करण्यात आली.

परदेशात मूल्यवर्धित आणि विशेष अन्नपदार्थांची वाढती मागणी लक्षात घेऊन, पारंपरिक वस्तूंहून पुढे जात नवीन बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यावसायिक आणि सरकारी यंत्रणांनी प्रयत्न तीव्र केल्याच्या पार्श्वभूमीवर ही सकारात्मक घडामोड समोर आली आहे.

वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, झारखंडमधील गुमला आणि देवघर येथील आम्रपाली आंबे दुबईला पाठवण्यात आले आहेत; तर कर्नाटकातील नीलम आणि तोतापुरी आंब्यांची मालदीवला निर्यात करण्यात आली आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील प्रीमियम अरेको चेरी आणि सेंट्रोज प्लम्सची यूएई व सिंगापूरमध्ये निर्यात झाली, तर उत्तराखंडमधील काशीपूर येथे उत्पादित फ्रोजन फ्रेंच फ्राइजची इराकमध्ये निर्यात करण्यात आली.

मेघालयातील री भोई येथील आले, अननस, मध आणि जीआय-टॅग प्राप्त लाकाडोंग हळदीची खेप सिंगापूरमध्ये पोहोचली, तर बिहारमधील दरभंगा येथील फ्लेव्हर्ड मखाण्याला कॅनडामध्ये ग्राहक मिळाले आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कंत्राटदारांना १२.५ कोटींचा दंड; मेट्रो मार्गिका ९ वर सुरक्षेचा भंग

Navi Mumbai : क्रेन कोसळून दोघा कामगारांचा मृत्यू

Pune : उत्सवामध्ये लाऊडस्पीकरच्या मर्यादांचे पालन करा! गिरीश महाजन यांचे आवाहन

Goa : अभिनेत्याच्या कारची बाप-लेकाच्या दुचाकीला जोरदार धडक; मदतीऐवजी स्थानिकांशी वाद, पत्नीवरही 'थुंकल्याचा' आरोप

विकसित भारतासाठी बँकिंग! सरकार उच्चस्तरीय समिती स्थापन करणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा