राष्ट्रीय

भारताची सुरक्षा अजून भक्कम! ‘आकाश-एनजी’ क्षेपणास्त्र यंत्रणेची चाचणी यशस्वी; ८० किमीच्या टप्प्यातील 'टारगेट' नष्ट करण्याची क्षमता

Akash-NG : ही क्षेपणास्त्र यंत्रणा भारतीय संरक्षण दलात सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या चाचणीच्या काळात ‘आकाश एनजी’ क्षेपणास्त्र यंत्रणेने वेगवेगळ्या हवाई धोक्यांच्या विरोधात अचूक कार्यक्षमता दाखवली.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताला संरक्षण क्षेत्रात आणखी एक यश मिळाले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) भावी पिढीतील आकाश क्षेपणास्त्र यंत्रणा म्हणजे ‘आकाश-एनजी’ (Akash-NG आकाश नेक्स जनरेशन) ची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. यामुळे ही क्षेपणास्त्र यंत्रणा भारतीय संरक्षण दलात सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या चाचणीच्या काळात ‘आकाश एनजी’ क्षेपणास्त्र यंत्रणेने वेगवेगळ्या हवाई धोक्यांच्या विरोधात अचूक कार्यक्षमता दाखवली. या क्षेपणास्त्र प्रणालीने वेगवान व कमी उंचीवरील लक्ष्यांसोबतच दूरवरील व अधिक उंचीवरील लक्ष्य भेदले.

हे क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवले असून देशात विकसित झालेल्या ‘रेडियो फ्रीक्वेन्सी’ यंत्रणा लावली आहे. यात डयूल पल्स सॉलिड रॉकेट मोटारचा वापर केला आहे. त्यामुळे क्षेपणास्त्राला अधिक ताकद मिळते. या यंत्रणेतील रडार व कमांड व कंट्रोल हे स्वदेशी आहेत. एकाचवेळी अनेक लक्ष्यांना भेदण्याची या यंत्रणेत क्षमता आहे. त्याचा पल्ला ३० किमी व १८ किमी उंचीवर हे क्षेपणास्त्र मारा करू शकते. हे क्षेपणास्त्र लढाऊ विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन, क्रूज मिसाइल आणि हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा मुकाबला करू शकते. या क्षेपणास्त्रांना पाकिस्तान किंवा चीनच्या सीमेजवळ तैनात केल्यास ७० ते ८० किमीच्या टप्प्यातील हवाई लक्ष्यांना ते नष्ट करू शकते, असे सूत्रांनी सांगितले.

ही चाचणी चंदीगढ येथील टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरीच्या रेल ट्रॅक रॉकेट स्लेड (आरटीआरएस) येथे करण्यात आली. या चाचणी यशस्वी झाल्याने भारताची संरक्षण तयारी अधिक सक्षम होईल. तसेच स्वदेशी संरक्षण संशोधनाला नवीन दिशा मिळू शकेल.

Thane : निवडणुकीआधी शिवसेना शिंदे गटाला धक्का; ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा

Nashik : महापालिका निवडणुकीआधी भाजपमध्ये मोठे पक्षप्रवेश; देवयानी फरांदे म्हणाल्या, "काही दलाल आणि स्वार्थी लोकांनी...

एकनाथ शिंदेंच्या 'त्या' वक्तव्यावर सुषमा अंधारेंचा पलटवार; म्हणाल्या, "तुम्हाला आनंद दिघेंची शपथ...

Tarique Rahman : १७ वर्षांनंतर बांगलादेशात घरवापसी करणारे तारिक रहमान नेमके कोण?

उबर-ओला-रॅपिडोसाठी केंद्र सरकारचा नवा नियम; महिला प्रवाशांसाठी खास सोय, राईडआधी टिप मागितली तर...