Photo : X (@DefenceNewsOfIN)
राष्ट्रीय

भारत AK-630 हवाई संरक्षण गन खरेदी करणार; एका मिनिटात ३ हजार गोळ्या झाडण्याची क्षमता

पाकिस्तानच्या जवळील भागात भारताने आपली सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी लष्कराने सहा 'एके-६३०' हवाई संरक्षण गन खरेदी करण्यासाठी निविदा जारी केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या जवळील भागात भारताने आपली सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी लष्कराने सहा 'एके-६३०' हवाई संरक्षण गन खरेदी करण्यासाठी निविदा जारी केली आहे.

लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये पाकिस्तान लष्कराने जम्मू-काश्मीर व पंजाबमध्ये दाट लोकसंख्या असलेल्या भागावर व धार्मिक स्थळांना लक्ष्य केले. आता या गन तैनात केल्याने सीमावर्ती भागात

हवाई धोक्यापासून चांगली सुरक्षा मिळेल. ही गन 'मिशन सुदर्शनचक्र'चा भाग आहे. 'एके-६३०' ही ३० मिमीची मल्टी बॅरल मोबाईल गन सिस्टीम आहे. ती प्रति मिनीट ३ हजार राऊंड झाडू शकते. याची मारक क्षमता ४ किमी आहे. ही यंत्रणा ड्रोन, रॉकेट, तोफांचा मारा, मोर्टार आदी हवाई हल्ले रोखण्यास सक्षम असेल. या यंत्रणेत सर्व हवामानात काम करू शकणारी, इलेक्ट्रो-ऑप्टिकल फायर कंट्रोल सिस्टम असेल. ती कोणत्याही वातावरणात आपल्या लक्ष्याची ओळख पटवेल.

भारतीय संरक्षण संशोधन संस्थेने (डीआरडीओ) ही यंत्रणा बनवली आहे. या यंत्रणेची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे.

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी