राष्ट्रीय

भारतात भ्रष्टाचार वाढला! क्रमवारीत झाली घसरण; पाकिस्तानची रँकिंग सुधारली, बघा डिटेल्स

Swapnil S

नवी दिल्ली : भारतात प्रत्येक सरकारी काम करायला हात ओले करावे लागतात, असा अनुभव सर्वसामान्य भारतीयांना येत असतो. करप्शन परसेप्शन इंडेक्समध्ये (सीपीआय) भारताची २०२३ मध्ये ९३ व्या स्थानावर घसरण झाली आहे. एक वर्षापूर्वी २०२२ मध्ये भारत ८५ व्या स्थानावर होता. या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या देशात सर्वात कमी भ्रष्टाचार आहे आणि १८० व्या क्रमांकावर असलेल्या देशात सर्वाधिक भ्रष्टाचार आहे.

२०२२ मध्ये भारताचा करप्शन परसेप्शन इंडेक्स ३९ होता, तो २०२३ मध्ये ४० वर घसरला आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या जागतिक पातळीवर भारताचा क्रमांक ८५ वरून ९३ वर गेला आहे. करप्शन परसेप्शन इंडेक्सनुसार भारताचे स्थान घसरले आहे.

जगातील १८० देशांपैकी डेन्मार्कमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार असून त्यांना सर्वाधिक ९० गुण मिळाले आहेत, तर भारताचा शेजारी असलेल्या आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानसाठी या इंडेक्समधून दिलासा मिळाला आहे. शहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांच्या राज्यात पाकिस्तानमधील भ्रष्टाचार कमी झाल्याचे म्हटले आहे. २०२२ साली पाकिस्तान १४०व्या क्रमांकावर होता. आता तो १३३ व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा सीपीआय २९ होता तो आता २७ झाला आहे.

जगभरातील देशांची सरासरी सीपीआय सलग १२व्या वर्षी ४३ इतकी राहिली आहे. दोन तृतीयांश देशांना ५० पेक्षा कमी गुण मिळाले. त्याचबरोबर जगभरात न्याय व्यवस्थेच्या कार्यपद्धतीत घसरण झाल्याचे म्हटले आहे. ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलचे अध्यक्ष फ्रॅकोइस यांनी म्हटले की, जोपर्यंत न्याय व्यवस्थेतील त्रुटी दूर केल्या जात नाहीत तोपर्यंत भ्रष्टाचार कमी होणार नाही.

डेन्मार्क, फिनलँडमध्ये कमी भ्रष्टाचार

डेन्मार्क, फिनलँड आणि न्यूझीलंड यांना अनुक्रमे ९०, ८७, ८५ सीपीआय मिळाले आहेत. या देशांत सर्वात कमी भ्रष्टाचार असल्याचे म्हटले आहे, तर सोमालिया (सीपीआय ११), व्हेनेझुएला (१३), सीरिया (१३), दक्षिण सुदान (१३) आणि यमन (१६) या देशात सर्वाधिक भ्रष्टाचार असल्याचे म्हटले आहे. सर्वाधिक भ्रष्ट देशांमध्ये सोमालिया अव्वल स्थानी आहे. या शिवाय काही देशांत सशस्त्र संघर्ष देखील सुरू आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस