वाढत्या अन्नधान्याच्या किमतीचा सामान्यांना फटका 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

वाढत्या अन्नधान्याच्या किमतीचा सामान्यांना फटका

अन्नधान्य महागल्यामुळे जून महिन्यात किरकोळ महागाईचा दर ४.३८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : अन्नधान्य महागल्यामुळे जून महिन्यात किरकोळ महागाईचा दर ४.३८ टक्क्यांवर पोहोचला आहे. या वाढीमुळे किमती वाढीचा दर रिझर्व्ह बँकेच्या ४ टक्क्यांच्या मध्यवर्ती लक्ष्याच्या वर गेला आहे. या वर्षी जानेवारीपासून अंमलात आलेल्या नवीन मालिके अंतर्गत किरकोळ महागाईने ४ टक्क्यांचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. या नवीन मालिकेचे पायाभूत वर्ष २०२४ आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या ग्राहक किंमत निर्देशांक आकडेवारीनुसार, जूनमध्ये सीपीआय-आधारित महागाई मे महिन्यातील ३.९३ टक्क्यांवरून वाढून ४.३८ टक्के झाली आहे. तर खाद्यपदार्थांची महागाई आधीच्या महिन्यातील ४.७८ टक्क्यांवरून जूनमध्ये वाढून ५.३२ टक्के झाली आहे.

एनएसओच्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये सर्वाधिक महागाई असलेल्या पहिल्या पाच वस्तूंमध्ये चांदी, सोने, हिरे आणि प्लॅटिनमचे दागिने; अद्रक, टोमॅटो, आणि बेदाणे व मनुका यांचा समावेश होता. तर सर्वात कमी महागाई असलेल्या पहिल्या ५ वस्तूंमध्ये बटाटा, मटार, मोटर कार आणि जीप, जिरे, आणि मोटरसायकल व स्कूटर यांचा समावेश होता.

देशाचा सरासरी महागाई दर ४.३८ टक्के असला तरी ग्रामीण आणि शहरी भागांसाठीचा संबंधित सीपीआय अनुक्रमे ४.७४ टक्के आणि ३.९२ टक्के होता. एनएसओच्या आकडेवारीनुसार, राज्यांमध्ये तेलंगणामध्ये सर्वाधिक महागाई (६.३६ टक्के) आणि मिझोराममध्ये सर्वात कमी महागाई (१.६३ टक्के) नोंदवली गेली.

एनएसओ सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील निवडक १,४०७ शहरी बाजारपेठांमधून (ऑनलाईन बाजारपेठांसह) आणि १,४६५ गावांमधून प्रत्यक्ष वेळेतील किमतींची आकडेवारी गोळा करते.

रिझर्व्ह बँक ऑगस्टमध्ये काय निर्णय घेणार

भारतीय रिझर्व्ह बँकेला दोन्ही बाजूंनी २ टक्क्यांच्या सुसह्य मर्यादेसह सीपीआय महागाई ४ टक्क्यांवर राखण्याचा अधिकार दिलेला आहे. द्वैमासिक पतधोरण ठरवण्यात सीपीआय हा एक महत्त्वाचा घटक असतो. जूनमधील बैठकीत मुख्य व्याजदर कायम ठेवताना, आरबीआयने २०२६-२७ साठी महागाईचा अंदाज आधीच्या ४.६ टक्क्यांवरून वाढवून ५.१ टक्के केला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राज्याच्या 'विधि व न्याय' विभागाच्या सचिवांना HC चा दणका; बजावली अवमान नोटीस, माफीनामाही फेटाळला

...तरच व्यापार करार! भारताला सवलतीचे दर द्या; केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांचा अमेरिकेला इशारा

Mumbai : बीकेसी-कुर्ला मार्गावर डबलडेकर बस चालवणे अशक्य; उंचीमुळे १५० नवीन ईव्ही डबलडेकर बस पुन्हा रखडल्या

Mumbai : १७,७२५ कोटींच्या मेट्रो मार्ग-१३ ला मंजुरी

Mumbai : लोकल फेऱ्यांची संख्या वाढणार; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती, मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेसचा शुभारंभ