(Photo-X)
राष्ट्रीय

Independence Day 2026 : 'वंदे मातरम्'च्या जयघोषाने दुमदुमला लाल किल्ला; ८०व्या स्वातंत्र्यदिनाचा ऐतिहासिक क्षण, Videos

या विशेष सोहळ्यात लष्कर, नौदल आणि हवाई दलातील २,५०० कॅडेट्स तसेच 'माय भारत'चे स्वयंसेवक सहभागी झाले असून...

किशोरी घायवट-उबाळे

नवी दिल्ली : देशाच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवारी (दि. १५) लाल किल्ल्यावर आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळ्यात 'वंदे मातरम्'चा जयघोष घुमला. स्वातंत्र्यानंतर प्रथमच १५ ऑगस्टच्या सोहळ्यात लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून 'वंदे मातरम्'चे सादरीकरण करण्यात आले.

'आज प्रत्येक हृदय वंदे मातरम्‌च्या तालावर'

लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आज प्रत्येक हृदय वंदे मातरम्‌च्या तालावर धडधडत आहे. आज हर घर तिरंगा आहे, हर मन तिरंगा आहे." असे त्यांनी सांगितले.

पहिल्यांदाच 'वंदे मातरम्'चा स्वर घुमला

"हा ऐतिहासिक दिवस आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून 'वंदे मातरम्'चा स्वर घुमला आहे. आजच्या सोहळ्यात उपस्थित प्रत्येकासाठी हा अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

'तिरंगा प्रत्येक घरात, प्रत्येक मनात'

'वंदे मातरम्'चा स्वर देशातील प्रत्येकाच्या मनात घुमत असल्याचे मोदी यांनी सांगितले. त्याचवेळी देशभरातील घरांवर तिरंगा फडकत असून, प्रत्येक भारतीयाच्या मनातही तिरंग्याची भावना असल्याचे त्यांनी नमूद केले. देश नव्या संकल्पांसह उत्साह आणि जोमाने पुढे जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

NCC कॅडेट्स आणि 'माय भारत' स्वयंसेवकांचे सादरीकरण

पंतप्रधान मोदींचे लाल किल्ल्यावरून भाषण पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय छात्र सेनेचे (NCC) कॅडेट्स आणि 'माय भारत'चे स्वयंसेवक 'वंदे मातरम्'चे सामूहिक सादरीकरण करणार आहेत. त्यानंतर राष्ट्रगीताचे सादरीकरण होईल.

२,५०० कॅडेट्स आणि स्वयंसेवकांचा सहभाग

या विशेष सोहळ्यात लष्कर, नौदल आणि हवाई दलातील २,५०० कॅडेट्स तसेच 'माय भारत'चे स्वयंसेवक सहभागी झाले असून लाल किल्ल्याच्या तटबंदीसमोरील ज्ञानपथावर त्यांची आसनव्यवस्था करण्यात आली होती.

'वंदे मातरम्'च्या माध्यमातून विशेष रचना

NCC कॅडेट्स आणि 'माय भारत'चे स्वयंसेवक ज्ञानपथावर एकत्र येऊन 'वंदे मातरम्'ची विशेष रचना साकारत आहेत. त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला देशभक्तीच्या भावनेसोबतच ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

जनगणनेसाठीची प्रश्नावली जारी; जातींची माहिती घेणार, रोजगार, आर्थिक व्यवहार, स्थलांतर याबाबतही सवाल

स्वातंत्र्यदिनानिमित्त ७८ शौर्य पुरस्कार जाहीर; १३ मरणोत्तर पुरस्कारांचा समावेश

Mumbai : मध्य रेल्वेवर आजपासून १५ डब्यांच्या आणखी २२ लोकल धावणार; अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, खोपोलीतील प्रवाशांना दिलासा

Mumbai : 'मुलुंड डम्पिंग'ची जागा अदानींशी संबंधित कंपनीला; १५ एकर जमीन पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्रच आघाडीवर; ३६ हजार कंपन्या बंद झाल्याच्या माहितीचा विपर्यास : मुख्यमंत्र्यांचा दावा