जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात ध्वजबैठक झाली. अलीकडे सीमेपलीकडून करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटना आणि आयईडीचे घडविण्यात आलेल्या स्फोट यामुळे निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली. चाकण-दा-बाग येथे ब्रिगेड-कमांडर स्तरावरील ही बैठक होती, सीमेवर शांतता राखण्याची गरज यावेळी दोन्ही बाजूंकडून व्यक्त करण्यात आली. ही बैठक जवळपास दीड तास सुरू होती. खेळीमेळीच्या q संमिश्र पानावरजम्मू : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात ध्वजबैठक झाली. अलीकडे सीमेपलीकडून करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटना आणि आयईडीचे घडविण्यात आलेल्या स्फोट यामुळे निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली. चाकण-दा-बाग येथे ब्रिगेड-कमांडर स्तरावरील ही बैठक होती, सीमेवर शांतता राखण्याची गरज यावेळी दोन्ही बाजूंकडून व्यक्त करण्यात आली. ही बैठक जवळपास दीड तास सुरू होती. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या बैठकीमध्ये शस्त्रसंधी कराराचे पालन करण्याचे दोन्ही बाजूंनी मान्य केले.
गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये फ्लॅग मिटींग झालेली नाही. शेवटची ध्वज बैठक २०२१ मध्ये झाली होती. त्यामुळेच ही बैठक खूप महत्वाची होती. बैठकीत २०२१ पासून नियंत्रण रेषेवर सुरू असलेला युद्धविराम कायम ठेवणे, नियंत्रण रेषेला तणावमुक्त करणे यासह इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा करून एकमत झाले. भारताकडून पूंछ ब्रिगेडचे कमांडर आणि पाकिस्तानी लष्कराच्या दोन पाकिस्तानी ब्रिगेडचे कमांडर बैठकीत सहभागी झाले होते.
एलओसीवर घडणाऱ्या घटनांमुळे चिंता
नियंत्रण रेषेवर तणाव वाढवण्यासाठी पाकिस्तान सातत्याने कट रचत आहे. काही दिवसांपासून एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. बुधवारी एलओसी ओलांडून राजौरीमध्ये भारतीय हद्दीत गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या या कृत्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले. ११ फेब्रुवारी रोजी जम्मू जिल्ह्यातील नियंत्रण रेषेच्या अखनूर सेक्टरमध्ये ‘आयईडी’ स्फोटात एका कॅप्टनसह दोन जवान शहीद झाले होते.
सैन्याची नियंत्रण रेषेवर तीक्ष्ण नजर
भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणा नियंत्रण रेषेवर सतत लक्ष ठेवून आहेत आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. पाकिस्तान सतत भारताविरुद्ध कट रचतो, पण भारतदेखील पाकिस्तानला प्रत्येक वेळी चोख प्रत्युत्तर देतो.