Photo : X (PMOIndia)
राष्ट्रीय

हे तर जागतिक स्थैर्याचा आधारस्तंभ; भारत - रशिया संबंध ; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

भारत आणि रशिया हे अगदी कठीण प्रसंगीही "खांद्याला खांदा लावून" उभे राहिले आहेत. भारत-रशिया संबंध हे जागतिक स्थैर्याचा आधारस्तंभ आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सांगितले.

Swapnil S

तिआनजीन : भारत आणि रशिया हे अगदी कठीण प्रसंगीही "खांद्याला खांदा लावून" उभे राहिले आहेत. भारत-रशिया संबंध हे जागतिक स्थैर्याचा आधारस्तंभ आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सांगितले.

शांघाय सहकार्य संघटनेच्या वार्षिक शिखर परिषदेत मोदी आणि पुतिन यांची भेट झाली. द्विपक्षीय सहकार्य आर्थिक, वित्तीय आणि ऊर्जा क्षेत्रांमध्ये कसे वाढवता येईल, यावर चर्चेचा केंद्रबिंदू होता.

अधिकृत चर्चेपूर्वी दोन्ही नेत्यांनी एससीओ शिखर परिषदेतील कार्यक्रमानंतर एकाच कारमधून प्रवास करताना ४० मिनिटांहून अधिक काळ अनौपचारिक संवाद साधला.

बैठकीतील दूरचित्रवाणीवरील उद्घाटनपर भाषणात मोदी म्हणाले की, युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या अलीकडील सर्व प्रयत्नांचे भारत स्वागत करतो. मानवतेचे आवाहन आहे की, शत्रुत्व शक्य तितक्या लवकर थांबवण्याचा मार्ग शोधला गेला पाहिजे.

युक्रेनमधील सुरू असलेल्या संघर्षावर आपली सतत चर्चा होत आहे. शांतता प्रस्थापनेसाठी अलीकडील सर्व प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. सर्व पक्षांनी सकारात्मक दृष्टीने पुढे जावे, असा आमचा विश्वास आहे. हा संघर्ष थांबवण्याचा व टिकाऊ शांततेचा मार्ग सापडला पाहिजे. ही संपूर्ण मानवजातीची आकांक्षा आहे, असे मोदी म्हणाले.

भारतीय प्रतिनिधींनी पुतिन यांना शनिवारी झालेल्या मोदी-युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांच्या दूरध्वनी संभाषणाची माहिती दिली, असे समजते.

पुतिन यांनी सांगितले की रशिया आणि भारताने दशकानुदशके "विशेष मैत्रीपूर्ण आणि विश्वासाधारित" संबंध टिकवून ठेवले आहेत आणि हेच भविष्यातील विकासाचे अधिष्ठान आहे. "हे संबंध पक्षीय राजकारणापलीकडचे आहेत आणि दोन्ही देशांच्या बहुसंख्य जनतेचे समर्थन यामागे आहे," असे ते म्हणाले.

भारतीय निवेदनानुसार, मोदींनी युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी घेतल्या जात असलेल्या अलीकडील पुढाकारांना पाठिंबा दर्शवला. संघर्षाचा अंत लवकर व्हावा आणि "कायमस्वरुपी शांततेचा" तोडगा निघावा, यावर त्यांनी भर दिला.

अमेरिकेने भारतावरील टॅरिफ दुप्पट करून ५० टक्क्यांवर नेल्यामुळे, तसेच रशियन खनिज तेल खरेदीवर २५ टक्के अधिभार लावल्यानंतर, भारत-अमेरिकेचे संबंध तणावपूर्ण झाले आहेत. अनौपचारिक चर्चेत मोदी-पुतिन यांनी याबाबतही चर्चा केल्याचे मानले जाते.

मोदी म्हणाले, " भारतीय डिसेंबरमध्ये रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे भारतात स्वागत करण्यास उत्सुक आहेत. हे आपल्या विशेष व सवलतीच्या सामरिक भागीदारीची व्याप्ती दाखवते. भारत आणि रशिया नेहमीच कठीण प्रसंगी एकत्र उभे राहिले आहेत. आपले घनिष्ठ सहकार्य हे दोन्ही देशांच्या जनतेसाठीच नव्हे, तर जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी महत्त्वाचे आहे," असे मोदी म्हणाले.

भारतीय निवेदनानुसार, मोदी-पुतिन यांनी आर्थिक, वित्तीय आणि ऊर्जा क्षेत्रांतील सहकार्याची समीक्षा केली व या क्षेत्रांतील सतत वाढणाऱ्या द्विपक्षीय संबंधांबद्दल समाधान व्यक्त केले.

"दोन्ही नेत्यांनी भारत-रशिया विशेष व सवलतीच्या सामरिक भागीदारीला अधिक मजबूत करण्यास समर्थन दर्शवले," असे निवेदनात म्हटले आहे.

मोदी-पुतीन यांची ‘लिमोझीन’मध्ये चर्चा

तियानजिन : पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या लिमोझिनमध्ये बसून शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) शिखर परिषदेच्या निमित्ताने येथे झालेल्या द्विपक्षीय चर्चेच्या स्थळी पोहोचवले. दोघांमध्ये जवळपास ५० मिनीटे चर्चा झाली.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता