नवी दिल्ली : भारतात डिजीटल क्रांती झाली आहे. भारतात वेगाने डिजीटल व्यवहार होत असून जगात तो सर्वात पुढे निघाला आहे. भारतात यूपीआयचे दरमहा १८ अब्ज व्यवहार होत आहेत.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या एका अहवालानुसार, ‘किरकोळ डिजीटलचे वाढते व्यवहार’ या विषयावर भारताची यूपीआय ही क्रांतीचे मुख्य स्त्रोत बनली आहे.
२०१६ मध्ये एनपीसीआयने यूपीआय सुरू केले. आता भारतात पैसे पाठवण्याचे व मिळण्याचे वेगवान, विश्वासार्ह रुप बनले आहे. यूपीआयच्याद्वारे मोबाईल ॲॅपमधून अनेक बँकांची खाती जोडली जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला कोणाला पैसे पाठवायचे असतील किंवा दुकानदाराचे पैसे द्यायचे असतील. एका क्लिकमध्ये पैसे दिले जातात.
भारतात दरमहा १८ अब्ज व्यवहार हे यूपीआयद्वारे होत आहेत. जून २०२५ मध्ये यूपीआयने १८.३९ अब्ज व्यवहार झाले. यातून २४.०३ लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली. जून २०२४ मध्ये १३.८८ अब्ज व्यवहार झाले होते. याचाच अर्थ एक वर्षात व्यवहारांमध्ये ३२ टक्के वाढ झाली.
सात देशात सेवा सुरू
यूपीआय आता भारतापर्यंत मर्यादित नाही. ही सेवा सात देशात सुरू झाली. त्यात यूएई, सिंगापुर, भूतान, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स व मॉरिशस आदींचा समावेश आहे. फ्रान्समध्ये यूपीआयची सुरुवात ही भारतासाठी मोठे पाऊल आहे. कारण युरोपातील हा पहिला प्रवेश आहे. आता तेथे राहणारे भारतीय कोणत्याही अडचणीशिवाय पैशांचे व्यवहार करत आहेत.
ब्रिक्स देशात विस्ताराची तयारी
यूपीआयला ब्रीक्स देशात सुरू करण्याची इच्छा भारताची आहे. त्यामुळे परदेशातून पैसे पाठवणे सोपे होईल. त्यामुळे आर्थिक सर्वंकषता निर्माण होणे शक्य बनेल. भारताचे डिजीटल नेतृत्व अधिक मजबूत होऊ शकेल.
९.१ कोटी व ६५ लाख व्यापारी जोडले
आज यूपीआय ४९.१ कोटी लोकांशी व ६५ लाख व्यापाऱ्यांशी जोडले गेले आहेत. यूपीआय आज ६७५ बँकांसोबत काम करत आहे. यामुळे कोणताही व्यक्ती कोणत्याही बँकेच्या सहाय्याने पैसे पाठवू शकतो. त्यासाठी बँकेच्या नावाची चिंता करण्याची गरज नाही.