अन्नपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ! जूनमध्ये घाऊक महागाईचा दर ९.८७ टक्क्यांवर 
राष्ट्रीय

अन्नपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ! जूनमध्ये घाऊक महागाईचा दर ९.८७ टक्क्यांवर

खाद्यपदार्थ आणि बिगर-खाद्य उत्पादनांच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे जून महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकवर आधारित महागाईचा दर वाढून ९.८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मे महिन्यात हा दर ९.६८ टक्के होता.

Swapnil S

नवी दिल्ली : खाद्यपदार्थ आणि बिगर-खाद्य उत्पादनांच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे जून महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकवर आधारित महागाईचा दर वाढून ९.८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. मे महिन्यात हा दर ९.६८ टक्के होता.

घाऊक महागाईची ही ताजी आकडेवारी २०२२-२३ या नवीन आधारभूत वर्षावर आधारित आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, एल निनोच्या प्रभावामुळे पावसाने दिलेल्या ओढीमुळे जून महिन्यात अन्नधान्याच्या किमती कमालीच्या वाढल्या आहेत.

अन्नधान्याची महागाई मे महिन्यातील ३.६० टक्क्यांवरून वाढून जूनमध्येही ५.४९ टक्क्यांवर पोहोचली आहे. बिगर-खाद्य वस्तू गटातील घाऊक महागाईचा दर ११.०७ टक्के उच्चांकी राहिला. खनिज क्षेत्रातील महागाईचा दर जून महिन्यात ९.४५ टक्के नोंदवला गेला. जून २०२६ मध्ये खनिज तेले (पेट्रोलियम उत्पादनांसह), अन्नपदार्थ, मूलभूत धातूंचे उत्पादन आणि रसायने व रासायनिक उत्पादनांचे उत्पादन हे घाऊक महागाई वाढवण्यामागील प्रमुख कारणे ठरली आहेत.

जागतिक घडामोडींमुळे इंधन क्षेत्रातील महागाईत काहीशी घट झाली आहे. मे महिन्यातील ३०.३३ टक्क्यांच्या उच्चांकावरून जूनमध्ये हा दर २७.४१ टक्क्यांवर खाली आला. अमेरिका- इराणमधील तात्पुरत्या करारामुळे तेलाच्या किमतींना मिळालेल्या विश्रांतीचा हा परिणाम होता. उत्पादित वस्तू क्षेत्रातील महागाई मे महिन्याप्रमाणेच जूनमध्येही ७.४८ टक्क्यांवर स्थिर राहिली.

तज्ज्ञांचे अंदाज

बार्कलेज : पश्चिम आशियात पुन्हा तणाव वाढल्याने कच्च्या तेलाच्या किमतींवर लक्ष ठेवावे लागेल. मात्र, घाऊक महागाई आता तिच्या उच्चांकाच्या जवळ असून पुढील काही महिन्यांत ती कमी होण्याची अपेक्षा आहे.

इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च : मुख्य घाऊक महागाई प्राथमिक वस्तूंमुळे वाढली आहे. जुलै २०२६ मध्ये महागाईचा दर १० टक्क्यांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. कारण एल निनोचा अन्नधान्याच्या किमतींवर परिणाम कायम राहू शकतो.

बीऑफए ग्लोबल रिसर्च : २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत घाऊक महागाईचा दर कमी होण्याची शक्यता आहे.

डब्ल्यूपीआयची जागा पीपीआय घेणार

हा सलग दुसरा महिना आहे जेव्हा सरकारने सुधारित २०२२-२३ आधारभूत वर्षावर आधारित घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) आणि उत्पादक किंमत निर्देशांक (पीपीआय) ची आकडेवारी एकत्रित जाहीर केली आहे. पुढील ५ वर्षांत घाऊक किंमत निर्देशांक पूर्णपणे बंद करून त्याची जागा पीपीआय घेईल. जूनमध्ये आऊटपूट पीपीआय ९.६ टक्के राहिला (मे महिन्यात हा ९.४ टक्के होता). ही वाढ प्रामुख्याने कृषी क्षेत्रातील महागाईमुळे झाली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली