Health Tips : जेवल्यानंतर लगेच झोपता? फक्त २ मिनिटं चालल्याने शरीरात काय बदल होतात? डॉ. नेनेंनी सांगितले शतपावलीचे फायदे

जेवल्यानंतर शतपावली का करावी? माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी २ ते ५ मिनिटं चालण्याचे फायदे सांगितले आहेत. पचन, ॲसिडिटी आणि रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो, जाणून घ्या.
Health Tips : जेवल्यानंतर लगेच झोपता? फक्त २ मिनिटं चालल्याने शरीरात काय बदल होतात? डॉ. नेनेंनी सांगितले शतपावलीचे फायदे
Health Tips : जेवल्यानंतर लगेच झोपता? फक्त २ मिनिटं चालल्याने शरीरात काय बदल होतात? डॉ. नेनेंनी सांगितले शतपावलीचे फायदे
Published on: 

जेवण झालं की अनेकांना लगेच सोफ्यावर बसून मोबाईल पाहण्याची किंवा थेट झोपण्याची सवय असते. पण आपल्या घरातील आई-आजी नेहमी सांगतात की, ‘जेवल्यानंतर लगेच झोपू नका, थोडं चालून या.’ पूर्वीपासून चालत आलेल्या या सवयीला ‘शतपावली’ असं म्हणतात. म्हणजेच जेवणानंतर साधारण १०० पावलं चालणं. ही सवय खरंच आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? याबाबत अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पती आणि कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. श्रीराम नेने यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, जेवल्यानंतर अवघी २ ते ५ मिनिटं आरामात चालल्याने पचनक्रिया आणि रक्तातील साखरेच्या नियंत्रणासाठी फायदा होऊ शकतो.

शतपावलीमागचं विज्ञान काय?

डॉ. नेने यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शतपावलीचं महत्त्व सांगितलं आहे. पूर्वी ग्लुकोज तपासणारी उपकरणं, पावलं मोजणारी घड्याळं किंवा आरोग्यविषयक ॲप्स नव्हती. तरीही भारतीय घरांमध्ये जेवणानंतर थोडं चालण्याची सवय होती.

डॉ. नेने यांच्या मते, यासाठी वेगळे व्यायामाचे कपडे घालण्याची किंवा नेमकी १०० पावलं मोजण्याची गरज नाही. १०० हा आकडा परंपरेतून आलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे जेवण झाल्यावर एकाच जागी बसून न राहता शरीराची थोडी हालचाल करणं.

पोट फुगणं आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होऊ शकतो

'द इंडियन एक्सप्रेस'ला माहिती देताना ठाण्यातील किम्स हॉस्पिटल्सचे कन्सल्टंट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. मनीष दोडमनी यांनीही या सवयीचे महत्त्व स्पष्ट केले.जेवल्यानंतर लगेच आडवं झाल्यास पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत येण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे छातीत जळजळ आणि ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

मात्र, जेवणानंतर हळूहळू चालल्याने अन्न पचनसंस्थेतून पुढे सरकण्यास मदत होते. पोटातील गॅस, फुगणं आणि जडपणा कमी होण्यासही फायदा होऊ शकतो. तसेच नियमित हलकी हालचाल केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.

Health Tips : जेवल्यानंतर लगेच झोपता? फक्त २ मिनिटं चालल्याने शरीरात काय बदल होतात? डॉ. नेनेंनी सांगितले शतपावलीचे फायदे
Health Tips : दिवसातून ३ वेळा पोटभर जेवता, तरीही थकवा जात नाही? डॉक्टरांनी सांगितलं कारण

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठीही फायदेशीर

किम्स हॉस्पिटल्सचे मधुमेहतज्ज्ञ डॉ. विजय नेगळूरू यांच्या मते, जेवणानंतर थोडं चालल्याने शरीराला रक्तातील ग्लुकोज वापरण्यास मदत होते. त्यामुळे जेवणानंतर अचानक वाढणाऱ्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास हातभार लागू शकतो.

यासाठी वेगाने चालण्यापेक्षा रोज थोडा वेळ चालण्याचं सातत्य महत्त्वाचं आहे. सकाळी नियमित फिरायला जाणाऱ्यांनीही जेवणानंतर काही मिनिटं चालण्याची सवय लावल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.

Health Tips : जेवल्यानंतर लगेच झोपता? फक्त २ मिनिटं चालल्याने शरीरात काय बदल होतात? डॉ. नेनेंनी सांगितले शतपावलीचे फायदे
वजन कमी म्हणजे मधुमेहाचा धोका नाही असं समजू नका; सडपातळ व्यक्तींनाही होऊ शकतो डायबिटीज, तज्ज्ञांचा इशारा

शतपावली करताना काय काळजी घ्यावी?

जेवणानंतर शतपावली करताना अगदी आरामात चालावं. जोरात चालणं, धावणं किंवा लगेच कठीण व्यायाम करणं टाळावं. त्यामुळे पोटात अस्वस्थता जाणवू शकते. तसंच, चालताना सतत मोबाईलमध्ये पाहण्याऐवजी शरीराची स्थिती आणि चालण्याकडे लक्ष द्यावं.

थोडक्यात, जेवणानंतर लगेच सोफ्यावर आडवं होण्याऐवजी घरात किंवा घराबाहेर २ ते ५ मिनिटं निवांत फेरफटका मारण्याची सवय उपयोगी ठरू शकते.

डिस्क्लेमर : या लेखातील माहिती सामान्य आरोग्यविषयक माहितीसाठी असून ती तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती आणि आरोग्यस्थिती वेगवेगळी असू शकते. या माहितीच्या अचूकतेची किंवा उपायांच्या परिणामांची नवशक्ती हमी देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.