राष्ट्रीय

भारत बनणार जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

वृत्तसंस्था

या दशकाच्या अखेरीस भारत ब्रिटनला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. ब्रिटीश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस म्हणाले की, दोन्ही अर्थव्यवस्था अंदाजे समान आहेत. पण, भारताचा विकास झपाट्याने होत असून तो यूकेला मागे टाकेल.

भारत-यूके कार्यक्रमात ते म्हणाले की, यूकेने युरोपियन युनियनला मागे टाकले आहे. त्यामुळे ही एक संधी आहे की आपण भारतासोबत खरोखर चांगले करू शकतो कारण आपल्याकडे राजकीय इच्छाशक्ती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लिझ ट्रस यांचे आठवड्याभरापूर्वी बोलणे झाले आणि ते सकारात्मक राहिले. या वर्षीच्या दिवाळीपर्यंत दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार करार (एफटीए) होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पुढील २५ वर्षात अर्थव्यवस्थेत वाढ होत असताना रोजगार वाढेल.

व्यापार दुप्पट होण्याची अपेक्षा

२०३०पर्यंत दोन्ही देशांमधील व्यापार दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. अहवालानुसार, भारत आणि ब्रिटनमधील अधिक आर्थिक कनेक्टिव्हिटीमुळे जागतिक पुरवठा साखळीचे वैविध्य आणि व्यवसाय करण्यात मदत होते. भारतातील यूकेच्या ६१८ कंपन्या ४.६६ लाख नोकऱ्या देतात. त्यांची उलाढाल ३,६३४.९ अब्ज रुपये आहे.

भारताची अर्थव्यवस्था मजबूत होण्याचा अंदाज असला तरी आशियाई विकास बँकेने २०२२-२३ साठी भारताचा विकास दर ७ टक्क्यांवर आणला आहे. यापूर्वी तो ७.२ टक्के असण्याचा अंदाज होता. महागाई आणि वाढत्या व्याजदरामुळे अर्थव्यवस्थेच्या विकास दरावर परिणाम होणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. अमेरिका आणि युरो क्षेत्र मंदीच्या दिशेने जात असले तरी त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही, असे एस ॲण्ड पीने म्हटले आहे.

क्रिसिलने म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षात बँकांचे बुडित कर्ज (एनपीए) ०.९० टक्का ते ५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. मार्च २०२४ पर्यंत ते चार टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते, जे एका दशकात कमी असेल. २६ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात बँकांची पत १५.५ टक्क्यांनी वाढली, तर ठेवी ९.५ टक्क्यांनी वाढल्या. चलनातील कर्ज आणि चलनी नोटांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे दुसऱ्या सहामाहीत बँकिंग प्रणालीमध्ये तरलतेची कमतरता असेल.

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?

'वडा पाव गर्ल'ला दिल्ली पोलिसांनी केली अटक? रस्त्यावरील हाय-व्होल्टेज ड्रामाचा Video Viral!

गाडी आहे की टँक! 2024 Force Gurkha भारतात लॉन्च, Mahindra Tharला देणार टक्कर