राष्ट्रीय

Terrorist Attack in Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये हवाई दलाच्या वाहनावर हल्ला; एक जवान शहीद, चार जखमी!

Terrorists Attack In Poonch: जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात पाच जवान जखमी झाले असून त्यापैकी एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Tejashree Gaikwad

Jammu And Kashmir, May 4: शनिवारी (४ मे २०२४) रोजी जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या (IAF) वाहनासह दोन वाहनांवर गोळीबार केला. या हल्ल्यात पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले असून त्यापैकी एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, जिल्ह्यातील सुरनकोट भागातील सनई टॉपकडे वाहने जात असताना संध्याकाळी शशिधरजवळ हा हल्ला झाला. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मोठ्या स्थरावर शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

जवानाचे बलिदान

दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हवाई योद्धांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, असे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या हल्ल्यात ५ जवानांना गोळ्या लागल्या. या जखमी जवानांना तात्काळ जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यातील उपचारादरम्यान एक जवान मरण पावला. स्थानिक सुरक्षा दलांकडून पुढील कारवाई सुरू आहे.

हवाई दलाची माहिती

हवाई दलाने आपल्या एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, शशिधरजवळ संध्याकाळी दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या वाहनासह दोन वाहनांवर गोळीबार केला, त्यात पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील शाहसीतारजवळ दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या वाहन ताफ्यावर हल्ला केला. स्थानिक लष्करी तुकड्यांकडून परिसरात घेराव आणि शोध मोहीम सुरू आहे. ताफ्याचा ताबा घेण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी अनुपस्थित शिक्षकांना दिलासा; ३ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण घेता येणार

एसटी प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेत मोठे पाऊल; सहा आठवड्यांत चौकशी पूर्ण करत अहवाल सादर करणे बंधनकारक

जळगाववरून आता दररोज विमानसेवा सुरू; जळगाव-मुंबई आणि जळगाव-अहमदाबाद प्रवासी सेवा

कल्याणमध्ये उद्या पाणीपुरवठा ठप्प