एएनआय
राष्ट्रीय

स्वदेशी 'इक्षक' जहाज आज नौदलाच्या ताफ्यात सामील होणार

संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, ‘इक्षक’ हे भारताच्या वाढत्या आत्मनिर्भरतेचे आणि स्वदेशी जहाजबांधणी क्षमतेचे उत्कृष्ट प्रतीक आहे. या जहाजामध्ये ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी उपकरणे आणि साहित्याचा वापर करण्यात आला आहे.

Swapnil S

कोची : स्वदेशी बनावटीचे ‘इक्षक’ जहाज गुरुवारी भारतीय नौदलात औपचारिकरित्या सामील होणार आहे. नौदलप्रमुख ॲॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नौदलाच्या या जहाजाचे निर्माण कोलकातास्थित ‘गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड’ने केले आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, ‘इक्षक’ हे भारताच्या वाढत्या आत्मनिर्भरतेचे आणि स्वदेशी जहाजबांधणी क्षमतेचे उत्कृष्ट प्रतीक आहे. या जहाजामध्ये ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी उपकरणे आणि साहित्याचा वापर करण्यात आला आहे.

‘इक्षक’ या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘मार्गदर्शक’ असा आहे. हे नाव या जहाजाच्या अचूकता, उद्देश आणि दिशा दाखवण्याच्या भूमिकेचे प्रतीक आहे. हे जहाज बंदर, किनारे आणि नौवहन मार्गांवर सखोल किनारी व खोल समुद्री सर्वेक्षण करण्यासाठी तयार केले गेले आहे. हे जहाज हाय-रिझोल्यूशन मल्टी-बीम इको साउंडर, ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेईकल, रिमोटली ऑपरेटेड व्हेईकल आणि चार सर्व्हे मोटर बोट्स यांसारख्या अत्याधुनिक हायड्रोग्राफिक आणि समुद्रविज्ञान उपकरणांनी सुसज्ज आहे.

“मी कोणत्या गोंधळात अडकलेय”! राहुल गांधींच्या दाव्यानंतर ब्राझिलच्या मॉडेलची पहिली प्रतिक्रिया; Video व्हायरल

Mumbai : BMC च्या महिला आरक्षण सोडतीची तारीख जाहीर; SC, ST आणि OBC प्रवर्गांसाठी प्रक्रिया सुरू

ऊसदराचे आंदोलन चिघळणार? कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर ऊस फेकण्याचा प्रयत्न

मुंबई आशियातील सर्वात 'आनंदी' शहर; बीजिंग आणि शांघायला मागे टाकत मारली बाजी

...अखेर जंजिरा किल्ला पुन्हा खुला; आठवडाभराच्या बंदीनंतर हवामान पूर्ववत