नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ७४ हजार डब्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे कॅमेरे (एआय कॅमेरे) बसवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सर्व १५ हजार इंजिनमध्येही हे कॅमेरे लावले जातील. यामुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत मिळू शकेल.
प्रत्येक डब्यात चार डोम कॅमेरे, तर इंजिनमध्ये ६ कॅमेरे लावले जातील. हे कॅमेरे डब्यातील दरवाजे, कॉरिडॉरमध्ये लावणार आहेत. त्यामुळे अडचणीच्या काळात व समाजकंटकांवर नजर ठेवण्यास त्यामुळे मदत मिळेल. या कॅमेऱ्यामुळे प्रवाशांच्या खासगीपणावर अंकुश येणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.
हे सर्व कॅमेरे रेकॉर्डिंग करतीलच. सोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता त्यात असेल. १०० किमी प्रति तास वेगाने जाणाऱ्या एक्स्प्रेस व कमी उजेडातही त्याचे फुटेज मिळू शकेल. या तंत्रज्ञानामुळे रेल्वे समाजकंटकांच्या हालचाली कळू शकतील. तसेच वेळीच कारवाई करता येईल. भारतीय रेल्वेतर्फे तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वापरला केला जाईल.
रेल्वेने कोणत्याही सीसीटीव्ही कंपनीला याची ऑर्डर दिली हे उघड झाले नाही.