राष्ट्रीय

डॉलरच्या तुलनेत रुपयाने गाठली सार्वकालिक नीचांकी पातळी; ३५ पैशांनी गडगडून ८३.४८ वर

अमेरिकन चलनाच्या तुलनेत शुक्रवारी रुपया ३५ पैशांनी घसरून ८३.४८ या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाला.

Swapnil S

मुंबई : अमेरिकन चलनाच्या तुलनेत शुक्रवारी रुपया ३५ पैशांनी घसरून ८३.४८ या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाला. विदेशी बाजार आणि कमकुवत आशियाई बाजाराचा भारतीय चलनाला फटका बसला. परकीय चलन व्यापाऱ्यांनी सांगितले की, परदेशी निधी काढून घेण्यात आल्याचाही परिणाम भारतीय चलनावर झाला.

इंटरबँक परकीय चलन बाजारात, डॉलरच्या तुलनेत स्थानिक युनिट ८३.२८ इतके कमकुवत उघडले आणि शेवटी ८३.४८ या नव्या नीचांकी पातळीवर बंद झाले. ८३.१३ या मागील बंदच्या तुलनेत रुपयाने ३५ पैशांची घसरण नोंदवली.

दिवसभरातील व्यवहारात अमेरिकन चलनाच्या तुलनेत रुपया ८३.५२ या नव्या नीचांकी पातळीवर पोहचून काही प्रमाणात सावरला. यापूर्वी १३ डिसेंबर २०२३ रोजी रुपयाने ८३.४० ही सार्वकालिक नीचांकी पातळी नोंदवली होती.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली