राष्ट्रीय

कर्करोगावर भारतीय मसाले गुणकारी; आयआयटी चेन्नईने घेतले पेटंट, २०२८ पर्यंत औषधे येणार बाजारात

Swapnil S

चेन्नई : जेवणाला चव येण्यासाठी मसाल्याचा वापर केला जातो. आता मसाल्याचा वापर कर्करोगाच्या उपचारासाठी रामबाण म्हणून गुणकारी ठरत आहे. कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारावर उपयुक्त ठरणाऱ्या भारतीय मसाल्यांचा वापर आयआयटी, मद्रासने केला असून त्याचे पेटंटही घेतले आहे. या मसाल्याचा वापर करून बनवलेली औषधे २०२८ पर्यंत बाजारात उपलब्ध होतील, असे आयआयटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतीय मसाल्यापासून बनलेल्या नॅनो औषधांनी फुफ्फुस, स्तन, मुख, सर्व्हायकल, थायरॉईड कर्करोगांच्या पेशीवर परिणाम केला आहे. आता कर्करोगाच्या औषधाची सुरक्षा व त्यासाठी लागणाऱ्या खर्चावर संशोधन केले जात आहे. सुरक्षा व खर्च ही मुख्य आव्हाने आहेत, असे हा अधिकारी म्हणाला. जनावरांवर या मसाल्यापासून बनलेल्या औषधांच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या. क्लीनिकल चाचण्या घेऊन २०२७-२८ पर्यंत ही औषधे बाजारात आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

आयआयटी मद्रासच्या रसायन अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक आर. नागराजन म्हणाले की, शेकडो वर्षांपासून भारतीय मसाले हे आरोग्यासाठी लाभदायक समजले जातात. पण, त्यावर फारसे संशोधन झाले नाही. पण आम्ही ‘नॅनो इमल्शन’ तंत्र तयार केले आहे. आम्ही प्रयोगशाळेत या तंत्राचा वापर केला. सक्रिय अवयव व कर्करोगांच्या पेशींशी संपर्काच्या पद्धतीची ओळख पटवण्यासाठी अभ्यास गरजेचा आहे. आमच्या प्रयोगशाळेत हे संशोधन सुरू राहील, असे ते म्हणाले.

पारंपरिक कर्करोग उपचार थेरपीपेक्षा नॅनो कर्करोग उपचार पद्धती अधिक फायदेशीर ठरत आहे. नॅनो कर्करोग उपचार पद्धतीत कोणतेही दुष्परिणाम नाही. तसेच खर्च कमी येतो, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबईत रोड शो; महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, कल्याणमध्ये जाहीर सभा

विषमतेच्या वारशाचे काय?

मोदी-शहा विसरले,गरिबी, बेरोजगारी आणि महागाई

नरेंद्र मोदींच्या डोक्यात घातला जिरेटोप; नव्या वादाला फुटले तोंड, शिवरायांचा अपमान केल्याची मविआची टीका

"प्रफुल्ल पटेल लाज बाळगा..."; मोदींच्या डोक्यात जिरेटोप घातल्यावरून शरद पवार गटाच्या नेत्याने सुनावले खडेबोल