भारताच्या निर्यातीत मे महिन्यात २०.५५ टक्के वाढ होऊन ३८.९४ अब्ज अमेरिकन डॉलर्स झाली आहे. तर व्यापार तूटही रुंदावरुन २४.२९ अब्ज डॉलर्सवर गेली असल्याचे बुधवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवरुन दिसून येते. आयात यंदा मे महिन्यात ६२.८३ टक्के वधारुन ६३.२२ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर गेली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये व्यापार तूट ६.५३ अब्ज डॉलर्स इतकी होती.
पेट्रोलियम आणि क्रूड तेल आयात यंदा मे मध्ये १०२.७२ टक्के वाढून १९.२ अब्ज डॉलर्स इतकी वाढली. कोळसा, कोकच्या आयातीत वाढ होऊन ५.५ अब्ज डॉलर्स झाली असून मे २०२१मध्ये ती २ अब्ज डॉलर्स झाली होती. तसेच सोन्याच्या आयातीतही ६ अब्ज डॉलर्स इतकी वाढ झाली असून मे २०२१ मध्ये ती ६७७ दशलक्ष डॉलर्स झाली होती.