राष्ट्रीय

इंडिगोला ९४४ कोटी रुपयांचा दंड; आयकर विभागाचा आदेश, कंपनी न्यायालयात आव्हान देणार

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची मूळ कंपनी असलेल्या ‘इंटरग्लोब एव्हिएशन’ला आयकर विभागाने ९४४.२० कोटी रुपयांचा दंड आकारण्याचा आदेश पाठवला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची मूळ कंपनी असलेल्या ‘इंटरग्लोब एव्हिएशन’ला आयकर विभागाने ९४४.२० कोटी रुपयांचा दंड आकारण्याचा आदेश पाठवला आहे. कंपनीने रविवारी एका एक्स्चेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, २०२१-२२ या कर निर्धारण वर्षासाठी आयकर कायद्याच्या कलम २७०अ अंतर्गत हा दंड आकारण्यात आला आहे. याविरुद्ध कंपनी न्यायालयात आव्हान देणार आहे.

यासोबतच, चेन्नईच्या संयुक्त आयकर आयुक्तांनी कंपनीला २.८४ कोटी रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दरम्यान, इंडिगोने आयकर दंड निराधार असल्याचे म्हटले आहे. कंपनीने सांगितले की कलम १४३(३) अंतर्गत कर निर्धारण आदेशाविरुद्धचे त्यांचे अपील प्रलंबित होते, परंतु कर अधिकाऱ्यांनी ते फेटाळून लावले आणि दंड ठोठावला.

कंपनीने पुढे म्हटले आहे की, ते या प्रकरणात कायदेशीर मार्ग स्वीकारतील आणि या आदेशाला आव्हान देतील. दंडाचा महसूल, कामकाज किंवा व्यवसायावर कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम होणार नाही.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video