ANI
राष्ट्रीय

देशात महागाईचा भडका; घाऊक महागाई दर १५.८८ टक्क्यांवर; गेल्या ९ वर्षातील उच्चांक

कच्च्या मालाच्या किंमती, वाहतूक खर्चाच्या किंमती वाढल्यामुळे घाऊक महागाई वाढली

वृत्तसंस्था

भारतात महागाईचा भडका उडाला आहे. किरकोळ महागाईनंतर आता घाऊक महागाईतही मोठी वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात महागाईचा दर १५.८ टक्के होता. या महागाईच्या दरात वाढ झाली असून हा टक्का १५. ८८ टक्क्यांवर गेला आहे. गेल्या ९ वर्षातील हा सर्वाधिक महागाई दर मानण्यात येत आहे.

यापूर्वी मार्च महिन्यात घाऊक महागाईचा दर (WPI) १४.५५ टक्क्यांवर पोहोचला होता. त्याअगोदर फेब्रुवारी महिन्यात हा दर १३.४३ टक्क्यांवरुन १३.११ टक्क्यांवर पोहोचला होता. घाऊक महागाईचा दर गेल्या वर्षी एप्रिल २०२१ मध्ये १०.७४ टक्क्यांवर होता. दरम्यान, एप्रिल २०२१ पासून सलग १३ महिने घाऊक महागाईचा दर दोन आकडी राहिला आहे. प्रामुख्याने खनिज तेल, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, अन्नपदार्थ, मूलभूत धातू, अ-खाद्य वस्तू, रसायने आणि रासायनिक उत्पादने आणि अन्न उत्पादने इत्यादींच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे महागाईत वाढ नोंदवण्यात आली होती. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने याबाबत एक निवेदन जाहीर केले आहे. तसेच भाजीपाला, गहू, फळे आणि बटाट्याच्या किंमतीत वर्षभरापूर्वीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. मे महिन्यात खाद्यपदार्थांची महागाई दर १२.३४ टक्के होती.

मे महिन्यात भाजीपाल्याच्या किमतीचा दर ५६.३६ टक्के, तर गव्हाच्या दर १०.५५ टक्के आणि अंडी, मांस आणि मासळीच्या भाववाढीचा दर ७.७८ टक्के होता. तर उत्पादित उत्पादने आणि तेलबियांमध्ये ती अनुक्रमे १०.११ टक्के आणि ७.८ टक्के होता. कच्च्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या महागाईचा दर ७९.५० टक्के होता. मे महिन्यात किरकोळ महागाई दर ७.४ टक्के होता. मध्यवर्ती बँकेने, गेल्या आठवड्यात, २०२२-२३ साठी महागाईचा अंदाज १०० आधार अंकांनी वाढवून ६.७ टक्क्यांवर नेला आहे.

आपल्या वार्षिक अहवालात, आरबीआयने म्हटले आहे, की कच्च्या मालाच्या किंमती, वाहतूक खर्चाच्या किंमती वाढल्यामुळे घाऊक महागाई वाढली आहे. या सर्व वस्तूंच्या किमती गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.

ठाकरे बंधूंची यंदा 'एकत्र' दिवाळी! मनसे दीपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते

वडिलांपेक्षा मुलगा वयाने मोठा कसा? सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासमोर प्रश्नांची सरबत्ती, राज ठाकरेंच्या प्रश्नांनी वेधले लक्ष

IPS पूरन कुमार प्रकरणाला नवे वळण; तपास करणाऱ्या IAS अधिकाऱ्याचीही आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : मुख्य आरोपी वीरेंद्र तावडेसह दोघांना जामीन

जैसलमेरमध्ये भीषण अपघात; खासगी बसला अचानक लागली आग, गाडी जळून खाक, ५७ जण करत होते प्रवास