राष्ट्रीय

म्युच्युअल फंडातील ओघ वाढता वाढे... जानेवारीमध्ये ४७ लाख गुंतवणूकदारांची खाती जोडली

या जोडणीसह, उद्योगातील म्युच्युअल फंड फोलिओ १७ कोटींपासून थोडेसे दूर असून १६.९६ कोटींवर गेले आहे. ए

Swapnil S

नवी दिल्ली : डिजिटायझेशनद्वारे व्यवहाराला चालना मिळत असल्याने जानेवारीमध्ये ४६.७ लाख गुंतवणूकदारांच्या खात्यांची भर पडल्याने म्युच्युअल फंड उद्योगामध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात, सरासरी फोलिओ जोडणी दरमहा २२.३ लाख होती आणि नवीनतम आकडेवारी या पातळीपेक्षा दुप्पट आहे.

या जोडणीसह, उद्योगातील म्युच्युअल फंड फोलिओ १७ कोटींपासून थोडेसे दूर असून १६.९६ कोटींवर गेले आहे. एका वर्षापूर्वी नोंदणीकृत १४.२८ कोटींवरून त्यात १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (ॲम्फी) च्या ताज्या आकडेवारीतून दिसून आले आहे.

मासिक आधारावर उद्योगाने फोलिओ संख्येमध्ये डिसेंबर २०२३ मधील १६.४९ कोटींच्या तुलनेत त्यात सुमारे ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. फोलिओ हे वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या खात्यांसाठी नियुक्त केलेले क्रमांक आहेत. गुंतवणूकदाराला अनेक फोलिओ असू शकतात.

व्हाइटओक म्युच्युअल फंडाचे मुख्य व्यवसाय अधिकारी प्रतीक पंत म्हणाले की, डिजिटल साक्षरतेची उच्च पातळी, वाढते उत्पन्न आणि वाढती आर्थिक साक्षरता या कारणांनी भारतीयांना मुदत ठेवी आणि पोस्ट ऑफिस बचत योजना इत्यादींसारख्या पारंपरिक आर्थिक साधनांच्या पलीकडे म्युच्युअल फंड उद्योगात गुंतवण्यास प्रोत्साहित केले आहे. विशेष म्हणजे, बहुसंख्य नवीन गुंतवणूकदार म्युच्युअल फंड क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी डिजिटल चॅनेलचा मार्ग स्वीकारत आहेत, असेही ते म्हणाले.

एकूण ४६.७ लाख फोलिओपैकी इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड योजनांनी वरील महिन्यात ३४.७ लाख फोलिओची भर घातली आहे. त्यामुळे अशा फोलिओजना ११.६८ कोटींच्या नवीन उच्चांकावर नेले असून ते एकूण फोलिओच्या ६९ टक्के प्रतिनिधित्व करते, असे जिओजितच्या एका अपडेटनुसार दिसून येते. तसेच, हायब्रीड फंडांनी मासिक आधारावर ३.३६ लाख फोलिओ जोडले आणि एकूण संख्या १.३१ कोटी झाली. दुसरीकडे, कर्ज योजनांमधील फोलिओ जानेवारीत सलग पाचव्या महिन्यात एकूण ७४.६६ लाखांवर घसरत आहेत. एकूणच, ४५ कंपन्यांच्या म्युच्युअल फंड उद्योगाकडे व्यवस्थापनाखालील जवळपास ५३ लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी...मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ; मिरवणुकीला जल्लोषात प्रारंभ

मुंबईत हाय अलर्ट! ३४ मानवी बॉम्ब पेरल्याची धमकी; 'लष्कर ए जिहादी'चा पोलिसांना संदेश

मला विचारून 'जीआर' काढल्याचा गैरसमज पसरवू नका! मंत्री भुजबळांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना थेट इशारा

अंजना कृष्णा धमकी प्रकरण : अजितदादांची सारवासारव; अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा उद्देश नव्हता!