नवी दिल्ली : आयटी कंपनी इन्फोसिसला चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ७.३ टक्क्यांनी घसरून ६,१०६ कोटी रुपये झाल्याचे कंपनीने गुरुवारी जाहीर केले. मागील वर्षी वरील कालावधीत कंपनीने ६,५८६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला होता.
इन्फोसिसने एका नियामक फाइलिंगमध्ये सांगितले की, कंपनीच्या ऑपरेशन्समधून एकत्रित महसूल या तिमाहीत १.३ टक्क्यांनी किरकोळ वाढून ३८,८२१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत तो ३८,३१८ कोटी रुपये होता. इन्फोसिसने चालू आर्थिक वर्षासाठी महसूल वाढीच्या अंदाजात सुधारणा केली असून आधीच्या अंदाजित १-२.५ टक्क्यांऐवजी आता १.५-२ टक्के नवा अंदाज जाहीर केला. कंपनीने असेही सांगितले की त्यांच्या संचालक मंडळाने बंगळुरू-आधारित सेमीकंडक्टर डिझाइन सेवा प्रदाता InSemi च्या सुमारे २८० कोटी रुपयांना अधिग्रहण करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. InSemi चे अधिग्रहण आर्थिक वर्ष २४ च्या चौथ्या तिमाहीत होण्याची अपेक्षा आहे, असे नियामकाला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
टीसीएसच्या निव्वळ नफ्यात ८.२ टक्के वाढ
देशातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनी टीसीएसला डिसेंबरला संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ८.२ टक्क्यांनी वाढ नोंदवून ११,७३५ कोटी नोंदवला. भारताच्या नेतृत्वाखाली उदयोन्मुख बाजारपेठांमधील मजबूत दुहेरी अंकी महसूल वाढीमुळे तिमाहीत कंपनीचा महसूल ४ टक्क्यांनी वाढून ६०,५८३ कोटी रुपये झाला आहे, असे कंपनीने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे. कंपनीचा ऑपरेटिंग नफा ५० बीपीएस ते २५ टक्क्यांनी सुधारला आहे, असे कंपनीने म्हटले आहे. तर निव्वळ नफा १९.४ टक्के आहे. कंपनीची ऑर्डर बुक ८.१ अब्ज डॉलर्स होती. तसेच ऑपरेशन्समधून निव्वळ रोख रक्कम ११,२७६ कोटी रुपये आहे, असे त्यात म्हटले आहे.