भारताला होर्मुझमधून सुरक्षित मार्ग देऊ; इराणने मैत्रीखातर दर्शवली तयारी  
राष्ट्रीय

भारताला होर्मुझमधून सुरक्षित मार्ग देऊ; इराणने मैत्रीखातर दर्शवली तयारी

भारत आणि इराणचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे इराण भारताला होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग देण्यास तयार आहे, असे इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फताली यांनी शुक्रवारी सांगितले.

Swapnil S

तेल अवीव/तेहरान : भारत आणि इराणचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे इराण भारताला होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग देण्यास तयार आहे, असे इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फताली यांनी शुक्रवारी सांगितले.

नवी दिल्ली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत फताली यांना विचारण्यात आले की, इराण भारताला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी देईल का? त्यावर फताली यांनी उत्तर दिले की, हो, कारण भारत आमचा मित्र आहे. दोन किंवा तीन तासांत ते घडताना दिसेल. भारत आणि इराणमध्ये सहकार्य आणि विश्वासाचे जुने नाते आहे, असे त्यांनी नमूद केले. इराकमध्ये कार्यरत असलेल्या इराण-समर्थित इस्लामिक गटाने विमान पाडण्याची जबाबदारी स्वीकारली आहे, एका निवेदनात यूएस सेंट्रल कमांडने म्हटले आहे की, या घटनेत दोन विमानांचा समावेश होता. एक विमान सुरक्षितपणे उतरले, तर दुसरे पश्चिम इराकवर कोसळले. ऑपरेशन एपिक फ्युरीदरम्यान ही घटना मैत्रीपूर्ण हवाई क्षेत्रात घडली आणि बचावकार्य सुरू आहे, असे अमेरिकेच्या लष्करी कमांडने म्हटले आहे.

अमेरिकेची आता सर्वच देशांना रशियन तेल खरेदीची ३० दिवसांची तात्पुरती परवानगी

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलरच्या वर गेल्या आहेत. यावर उपाय म्हणून आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने आता सर्वच देशांना रशियाकडून तेल खरेदी करण्याची ३० दिवसांची तात्पुरती परवानगी दिली आहे, कारण अनेक रशियन तेल टँकर समुद्रात अडकले आहेत. भारताला रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठीचे निर्बंध अमेरिकेने शिथिल केले होते. तथापि, भारत तेल खरेदी करण्यासाठी कोणत्याही देशाच्या परवानगीवर अवलंबून नाही, असे भारतीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने (वित्त मंत्रालयाने) गुरुवारी परवाना जारी केला. या परवान्याअंतर्गत, १२ मार्च रोजी रात्री १२.०१ वाजण्यापूर्वी जहाजांवर लोड केलेल्या रशियन कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांची डिलिव्हरी आणि विक्री करता येते. ही सूट फक्त ११ एप्रिलपर्यंत वैध आहे. वाढत्या किमती रोखण्यासाठी जागतिक तेल पुरवठा वाढवणे हा यामागील उद्देश असल्याचे अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसंट यांनी सांगितले.

रशियाला फारसा फायदा होणार नाही

स्कॉट बेसंट यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, ट्रम्प जागतिक ऊर्जा बाजारपेठ स्थिर करू इच्छितात. त्यांनी म्हटले आहे की, हा एक अल्पकालीन निर्णय आहे आणि त्यामुळे रशियाला कोणताही महत्त्वपूर्ण आर्थिक फायदा होणार नाही. रशियाच्या महसुलाचा मोठा भाग तेल उत्खननदरम्यान आकारल्या जाणाऱ्या करांमधून येतो, तर ही सूट फक्त आधीच वाहतुकीत असलेल्या तेलावर लागू होते, असे बेसंट यांचे मत आहे.

पुरवठा विस्कळीत

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जगातील सर्वात महत्त्वाचा तेल मार्ग असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पुरवठा विस्कळीत झाला आहे. जगातील सुमारे २० टक्के तेल या मार्गाने जाते. भारतासारखे देश त्यांच्या तेलाच्या गरजेपैकी जवळजवळ अर्धा भाग या मार्गाने आयात करतात.

तेलदर २०० डॉलर होणार?

अलिकडच्या काळात ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल १२० डॉलरच्या जवळपास पोहोचल्या आहेत. इराणने इशारा दिला आहे की किमती २०० डॉलरपर्यंत पोहोचू शकतात. अशा परिस्थितीत, बाजारात रशियन तेलाचे आगमन झाल्याने पुरवठा वाढेल, ज्यामुळे किंमती कमी होतील. मध्यपूर्वेतील ऊर्जा पुरवठा आणि पायाभूत सुविधांवर अलिकडेच झालेल्या हल्ल्यांनंतर, कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा ९ टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या आहेत. या वाढीसह, तेलाच्या किमती पुन्हा एकदा प्रति बॅरल १०० डॉलरवर गेल्या आहेत.

गावांमध्ये ४५ दिवसांनंतर दुसरा सिलिंडर मिळणार

आखाती युद्धामुळे आता ग्रामीण भागातील ग्राहकांना सिलिंडर मिळाल्यानंतर पुढील सिलिंडर ४५ दिवसांनी बुक करता येणार आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत सांगितले की, पुरवठा अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यासाठी आणि अनावश्यक 'पॅनिक बुकिंग' थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

ओमानमध्ये दोन भारतीयांचा मृत्यू

ओमानच्या सोहर प्रांतात ड्रोन कोसळल्याने दोन भारतीय कामगारांचा मृत्यू झाला. सुरक्षा दलांनी हे ड्रोन पाडल्याचे वृत्त आहे. पाडण्यात आलेल्या ड्रोनच्या ढिगाऱ्याखाली सापडून हे दोन भारतीय ठार झाल्याचे सांगण्यात आले.

इराण लवकरच शरणागती पत्करेल - ट्रम्प

अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त लष्करी कारवाईमुळे इराणवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. इराणच्या नौदलाचे आणि हवाई दलाचे मोठे नुकसान झाले आहे आणि त्यांची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन क्षमता वेगाने नष्ट केली जात आहेत. ऑपरेशन ‘एपिक फ्युरी’मुळे इराण लवकरच शरणागती पत्करू शकतो, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘जी ७’ नेत्यांसोबतच्या व्हर्च्युअल बैठकीत

अमेरिकन लष्करी विमान कोसळून ४ जणांचा मृत्यू

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे कमालीची तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असतानाच या युद्धादरम्यान इराकमध्ये, अमेरिकन हवाई दलाचे विमान कोसळल्याची घटना समोर आली आहे. त्यामध्ये विमानातील चार क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला असून अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने याची पुष्टी केली आहे. या घटनेनंतर, इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षात मृत्युमुखी पडलेल्या अमेरिकन सैनिकांची संख्या ११ वर पोहोचली आहे. अपघातग्रस्त विमानात पाच क्रू मेंबर्स होते. पश्चिम इराकमध्ये बचाव कार्य सुरू आहे तेथे ही घटना घडली. हे विमान केसी-१३५ एरियल टँकर होते, जे अमेरिकन सैन्याने लांब पल्ल्याच्या मोहिमांमध्ये लढाऊ विमाने आणि इतर विमानांना इंधन भरण्यासाठी वापरले जात होते.

'रील्स'ची नशा आपला घात करणार

आजचे राशिभविष्य, १४ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Gudi Padwa 2026 : सणासुदीला खास गोड पदार्थ; घरच्या घरी तयार करा नारळाचे मोदक

"...तर महिलांना कोणी नोकरी देणार नाही"; मासिक पाळी रजेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Mumbai : पालिका शाळाही ‘गॅस’वर; मध्यान्ह भोजनात आता विद्यार्थ्यांना फळ वाटप, रुग्णालयांत सिलिंडर पुरवठा करण्यासाठी गॅस कंपनीला पत्र