Photo : X
राष्ट्रीय

असे असेल भारतीय अंतराळ स्थानक

दोन दिवसांच्या राष्ट्रीय अंतराळ दिन सोहळ्यात शुक्रवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO)भारतीय अंतराळ स्थानकाचे (बीएएस) मॉडेल सादर केले.

Swapnil S

नवी दिल्ली : दोन दिवसांच्या राष्ट्रीय अंतराळ दिन सोहळ्यात शुक्रवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO)भारतीय अंतराळ स्थानकाचे (बीएएस) मॉडेल सादर केले.

भारत २०२८ पर्यंत ‘बीएएस’चे पहिले मॉड्यूल प्रक्षेपित करण्याची योजना आखत आहे. यामुळे भारत त्या मोजक्या देशांच्या गटात सामील होईल ज्यांच्याकडे स्वतःचे कक्षीय प्रयोगशाळा आहेत.

सध्या दोनच कक्षीय प्रयोगशाळा कार्यरत आहेत. पाच अंतराळ संस्थांच्या संयुक्त संचालनाखालील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आणि चीनचे तियानगोंग अंतराळ स्थानक कार्यरत आहे.

भारताने २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानकाची पाच मॉडेल तयार करण्याचा आराखडा आखला आहे. ‘बीएएस-०१’ मॉड्यूल १० टन वजनाचे असून पृथ्वीपासून ४५० किमी उंचीवर लो अर्थ ऑर्बिटमध्ये प्रस्थापित केले जाणार आहे.

हे स्थानक अंतरिक्ष, जीवन विज्ञान, औषधशास्त्र आणि आंतरग्रहीय संशोधनासाठी एक संशोधन व्यासपीठ ठरेल.

मानवी आरोग्यावर सूक्ष्म गुरुत्वाकर्षण परिणाम अभ्यासण्याची तसेच अंतराळात दीर्घकालीन मानवी उपस्थितीसाठी आवश्यक तंत्रज्ञानाची चाचणी करण्याची संधी ते उपलब्ध करून देईल. भारतीय अंतरिक्ष स्थानक अंतराळ पर्यटनालाही चालना देईल आणि व्यावसायिक अंतराळ क्षेत्रात भारताचे पाऊल मजबूत करेल.

आंतरराष्ट्रीय सहकार्य, वैज्ञानिक संशोधन केंद्र व तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान म्हणून त्याची भूमिका महत्त्वाची असेल. भव्य ‘बीएएस-०१’ मॉडेल भारत मंडपम येथे झालेल्या राष्ट्रीय अंतरिक्ष दिन सोहळ्यात विशेष आकर्षण ठरले.

बीएएसची वैशिष्ट्ये

  • देशी तंत्रज्ञानावर आधारित पर्यावरण नियंत्रण व जीवनाश्यक यंत्रणा

  • भारत डॉकिंग सिस्टीम, भारत बर्थिंग मेकॅनिझम

  • स्वयंचलित हॅच प्रणाली

  • सूक्ष्म गुरुत्वाकर्षण संशोधन व तंत्रज्ञान प्रदर्शनासाठी व्यासपीठ

  • वैज्ञानिक इमेजिंग व क्रू रिक्रिएशनसाठी व्ह्यूपोर्ट्स

  • प्रणोदन, द्रवपदार्थांची पुनर्भरण व्यवस्था

  • विकिरण, उष्णता व मायक्रो मिटीऑरॉइड ऑर्बिटल डेब्रिस संरक्षण

  • स्पेस सूट्स, एक्स्ट्रा-व्हेहिक्युलर ॲक्टिव्हिटीसाठी एरलॉक्स

  • ‘प्लग अँड प्ले’ इंटिग्रेटेड एव्हिऑनिक्स

Mira Bhayandar :अनधिकृत पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई; ५० हजारांचा दंड, नळजोडणीही खंडित होणार

MMC कडून तक्रारींच्या निवारणाला गती; ४३ प्रकरणे निकाली, मात्र ८४९ तक्रारी प्रलंबित

Mumbai : मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कॅम्पला प्रतिसाद; सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे आयोजन

Mumbai : बनावट खात्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; ७.४२ कोटींचे सायबर फ्रॉड उघडकीस

आदिवासीबहुल जिल्ह्यात दोन वर्षांत एकूण ८१४ बालक-माता मृत्यू; पालघर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे अपयश उघड