छाया सौजन्य - ANI
राष्ट्रीय

इस्रोच्या PSLV-C62 मोहिमेला धक्का; प्रक्षेपणानंतर रॉकेटवरील नियंत्रण सुटले, १६ उपग्रह अंतराळात हरपले

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (ISRO) सोमवारी २०२६ मधील पहिल्या अंतराळ मोहिमेत मोठा धक्का बसला आहे. प्रक्षेपणानंतर सुरुवातीचे काही मिनिटे सर्व काही नियोजनानुसार पार पडले. चार टप्प्यांच्या PSLV रॉकेटपैकी पहिला आणि दुसरा टप्पा पूर्णपणे यशस्वी ठरला. मात्र, तिसऱ्या टप्प्यात रॉकेटच्या उड्डाण मार्गात

Krantee V. Kale

श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (ISRO) सोमवारी २०२६ मधील पहिल्या अंतराळ मोहिमेत मोठा धक्का बसला आहे. इस्रोच्या पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (PSLV-C62) मोहिमेदरम्यान प्रक्षेपणानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाला. रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्यात (PS3 stage) अखेरच्या क्षणी मार्गात विचलन (deviation) आढळून आले. ज्यामुळे अपेक्षित कक्षेत (ऑर्बिट) जाणे शक्य झाले नाही. परिणामी या मोहिमेत पाठवण्यात आलेले सर्व १६ उपग्रह अंतराळात हरपले.

“PSLV-C62 मोहिमेदरम्यान PS3 टप्प्याच्या शेवटी तांत्रिक अडथळा निर्माण झाला. या संदर्भात सविस्तर विश्लेषण सुरू करण्यात आले आहे.” असे, इस्रोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर माहिती देताना सांगितले आहे. ही मोहीम इस्रोची २०२६ मधील पहिली अंतराळ मोहीम होती. या अंतर्गत EOS-N1 (अन्वेषा) हा प्रमुख उपग्रह, १४ सहप्रवासी उपग्रह आणि एक री-एंट्री कॅप्सूल अवकाशात पाठवण्यात आले होते.

तिसऱ्या टप्प्यात अखेरच्या क्षणी बिघाड

१२ जानेवारी २०२६ रोजी श्रीहरिकोटा येथून PSLV-C62 चे सकाळी १०.१७ वाजता प्रक्षेपण यशस्वी आणि नेत्रदीपक झाले होते. इस्रोनुसार, प्रक्षेपणानंतर सुरुवातीचे काही मिनिटे सर्व काही नियोजनानुसार पार पडले. चार टप्प्यांच्या PSLV रॉकेटपैकी पहिला आणि दुसरा टप्पा पूर्णपणे यशस्वी ठरला. मात्र तिसऱ्या टप्प्यात रॉकेटच्या उड्डाण मार्गात विचलन दिसून आले, ज्यामुळे अपेक्षित कक्षेत (ऑर्बिट) जाणे शक्य झाले नाही.

इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी सांगितले की, “PSLV हे चार टप्प्यांचे प्रक्षेपण वाहन आहे, ज्यामध्ये दोन घनइंधन (सॉलिड) आणि दोन द्रवइंधन (लिक्विड) टप्पे आहेत. तिसऱ्या टप्प्याच्या अखेरीपर्यंत वाहनाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होती. मात्र, त्याच टप्प्याच्या शेवटी वाहनात अधिक अस्थिरता दिसून आली आणि उड्डाण मार्गात विचलन आढळले. सध्या सर्व डेटा तपासला जात असून लवकरच सविस्तर माहिती दिली जाईल.” सध्या उपलब्ध डेटाचे सखोल विश्लेषण केले जात असून, लवकरच अधिक तपशील जाहीर करण्यात येतील. मात्र, त्यांनी अद्याप मोहिमेला पूर्ण अपयश किंवा यश असे स्पष्टपणे घोषित केलेले नाही.

यापूर्वीही तिसऱ्या टप्प्यात बिघाड

ही घटना काही महिन्यांपूर्वीच्या PSLV-C61 मोहिमेच्या अपयशाची आठवण करून देणारी आहे. १८ मे २०२५ रोजी झालेल्या त्या मोहिमेतही तिसऱ्या टप्प्यातील बिघाडामुळे EOS-09 पृथ्वी निरीक्षण उपग्रह योग्य कक्षेत स्थापित होऊ शकला नव्हता.

स्टार्टअप्ससाठीही धक्का

या मोहिमेचा अंतिम निष्कर्ष समोर आल्यानंतर त्याचे परिणाम केवळ इस्रोसाठीच नव्हे, तर PSLV वर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या भारतीय आणि खासगी स्टार्टअप्ससाठीही महत्त्वाचे ठरणार आहेत. उपग्रह प्रक्षेपणासाठी PSLV ही विश्वासार्ह प्रणाली मानली जाते, त्यामुळे या घटनेमुळे अंतराळ क्षेत्रातील पुढील नियोजनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, इस्रोच्या तांत्रिक समितीकडून बिघाडाची कारणे शोधण्यासाठी तपास सुरू असून, लवकरच अधिकृत स्पष्टीकरण दिले जाण्याची अपेक्षा आहे.

"...तर महिलांना कोणी नोकरी देणार नाही"; मासिक पाळी रजेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Mumbai : पालिका शाळाही ‘गॅस’वर; मध्यान्ह भोजनात आता विद्यार्थ्यांना फळ वाटप, रुग्णालयांत सिलिंडर पुरवठा करण्यासाठी गॅस कंपनीला पत्र

घरगुती गॅस पुरवठ्यावर सरकारची नजर; जिल्हास्तरीय समित्या स्थापन, अफवांवर कारवाईचा इशारा

ST डेपोच्या विकासासाठी भाडेकराराला ९८ वर्षांपर्यंत वाढ; सरकारकडे प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी दाखल

'गॅस अपडेट'च्या नावाने ऑनलाइन फसवणूक; कल्याण-डोंबिवलीत दोन महिलांना ४ लाखांचा गंडा