संग्रहित छायाचित्र पीटीआय
राष्ट्रीय

पुरीचे जगन्नाथ मंदिर उडवून देण्याची धमकी; भाविकांमध्ये घबराट, पोलीस अलर्ट

जगन्नाथ मंदिराच्या बाहेर परिक्रमा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेरिटेज कॉरिडॉरजवळील दुसऱ्या एका मंदिराच्या भिंतीवर ओदिया आणि इंग्रजी अशा दोन भाषेत भिंतीवर एक संदेश लिहून ही धमकी देण्यात आली आहे. मंदिराच्या भिंतीवर काही फोन नंबर देखील लिहिलेले असल्याचे आढळून आले. तसेच...

Swapnil S

पुरी : ओदिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आल्याने त्यामुळे पुरीमध्ये खळबळ उडाली आहे. या धमकीमुळे येथील भाविकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले असून या घटनेनंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. तसेच मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे.

जगन्नाथ मंदिराच्या बाहेर परिक्रमा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेरिटेज कॉरिडॉरजवळील दुसऱ्या एका मंदिराच्या भिंतीवर ओदिया आणि इंग्रजी अशा दोन भाषेत भिंतीवर एक संदेश लिहून ही धमकी देण्यात आली आहे. भिंतीवर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे की, जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ला करतील आणि ते नष्ट करतील. त्याचप्रमाणे कॉल करा, अन्यथा सर्वकाही उद्ध्वस्त होईल, असे त्या ठिकाणी लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे.

मंदिराच्या भिंतीवर काही फोन नंबर देखील लिहिलेले असल्याचे आढळून आले. तसेच त्या ठिकाणी पंतप्रधान मोदी असे शब्दही लिहिले असल्याचे आढळले आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ पुढील तपास सुरू केला आहे. या बरोबरच हेरिटेज कॉरिडॉरच्या परिसरातील काही सजावटीचे दिवे देखील अचानक खराब झाल्याचे आढळले आहे. सजावटीचे दिवे अचानक खराब कसे झाले, याबाबतही आता सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.दरम्यान, जगन्नाथ मंदिर परिसरात असंख्य सीसीटीव्ही कॅमेरे आणि सतत पोलिसांच्या देखरेखीखाली असलेल्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे भाविकांकडून अनेक वेगवेगळे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्यामुळे पोलिसांबाबत आणि मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

फुटेजची तपासणी

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, भिंतीवर अशा प्रकारे धमकीचा संदेश लिहिलेल्या घटनेनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. अशा प्रकारचा संदेश गैरकृत्य म्हणून लिहिले गेले असल्याचाही संशय आहे. आम्ही आता कॅमेऱ्यांमधील फुटेजची तपासणी करत आहोत. आम्ही हे प्रकरण खूप गांभीर्याने घेत आहोत. मंदिर आणि भाविकांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.

Mumbai : दहिसर टोलनाका स्थलांतरित होणार; वेस्टर्न हॉटेलच्या पुढे हलविण्याचे आदेश

ठाणे : कसं दिसतं नवीन गडकरी रंगायतन? उद्या होणार लोकार्पण, बघा फोटो

कबुतरांना दाणे टाकण्यावर बंदी कायम; तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन - हायकोर्ट

मुंबईकरांना स्वातंत्र्यदिनाचं गिफ्ट! उद्यापासून कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; विहार क्षेत्र, भुयारी मार्गाचं आज लोकार्पण

भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणाचा पुनर्विचार करू! सरन्यायाधीशांनी दिली लक्ष घालण्याची हमी