४८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील 'रत्न भांडार' उघडले; दागिन्यांच्या मोजमापास सुरुवात 
राष्ट्रीय

४८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुरीच्या जगन्नाथ मंदिरातील 'रत्न भांडार' उघडले; दागिन्यांच्या मोजमापास सुरुवात

जगप्रसिद्ध पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराच्या 'रत्न भांडारा'तील दागिन्यांची आणि मौल्यवान वस्तूंची मोजणी तब्बल ४८ वर्षांच्या खंडानंतर बुधवारी अधिकृतपणे सुरू झाली. श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११.३० च्या सुमारास अधिकृत कर्मचाऱ्यांनी पारंपारिक वेशात (धोतर आणि गमछा) मंदिरात प्रवेश केला.

Swapnil S

पुरी : जगप्रसिद्ध पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराच्या 'रत्न भांडारा'तील दागिन्यांची आणि मौल्यवान वस्तूंची मोजणी तब्बल ४८ वर्षांच्या खंडानंतर बुधवारी अधिकृतपणे सुरू झाली. श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११.३० च्या सुमारास अधिकृत कर्मचाऱ्यांनी पारंपारिक वेशात (धोतर आणि गमछा) मंदिरात प्रवेश केला.

दुपारी १२.०९ ते १.४५ या नियोजित शुभ मुहूर्तावर मोजणीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. या प्रक्रियेदरम्यान केवळ अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश देण्यात आला असून आतील भाग भाविकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

मोजणी कशी

राज्य सरकारने मंजूर केलेल्या 'एसओपी'नुसार, सुरुवातीला दैनंदिन विधींसाठी वापरल्या जाणाऱ्या दागिन्यांची मोजणी होईल. त्यानंतर रत्न भांडाराचा बाह्य कक्ष आणि सरतेशेवटी सर्वात महत्त्वाचा असलेला 'अंतर्गत कक्ष' उघडला जाईल.

१९७८ चा इतिहास

यापूर्वी १३ मे ते २३ जुलै १९७८ दरम्यान रत्न भांडाराची मोजणी करण्यात आली होती. त्यावेळी ७२ दिवस चाललेल्या या प्रक्रियेत खालील साठा सापडला होता:सोने: ४५४ वस्तू (वजन: १२८.३८ किलो), चांदी: २९३ वस्तू (वजन: २२१.५३ किलो), इतर: मोठ्या प्रमाणात मौल्यवान रत्ने.

Mumbai : मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; कुर्ला ते वाशी मार्गावर ब्लॉक

Mumbai Hit-and-Run : मिठीबाई कॉलेजजवळ भरधाव दुचाकीची १५ वर्षीय मुलीला धडक; चालक फरार, CCTV फुटेज व्हायरल

तेलंगणातील फार्मा कंपनीत भीषण स्फोट; २ जणांचा मृत्यू, ९ कामगार जखमी, Video

Thane : वर्षभर रखडलेल्या भरती प्रक्रियेला वेग; ७०८ पदांसाठी १ आणि २ सप्टेंबरला परीक्षा

Mumbai : ५० फेलोच्या जागेसाठी बीटेक, डॉक्टरांचे अर्ज; ५० जागांसाठी ४५०० जणांचे आवेदन, महापालिकेत कंत्राटी भरती