राष्ट्रीय

देव करो, कुणी नरेटिव्हच्या जाळ्यात अडकू नये - धनखड; राजीनाम्यानंतर प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी

देव करो आणि कुणी नरेटिव्हच्या फेऱ्यात अडकू नये, या चक्रव्यूहात कुणी अडकला तर त्यातून बाहेर येणे कठीण आहे, झोपलेल्यांना जागे करू शकतो, पण जे जागे असूनही झोपेचे सोंग घेतात त्यांना जागे करता येणार नाही, असे सूचक वक्तव्य माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शनिवारी येथे केले.

Swapnil S

भोपाळ : देव करो आणि कुणी नरेटिव्हच्या फेऱ्यात अडकू नये, या चक्रव्यूहात कुणी अडकला तर त्यातून बाहेर येणे कठीण आहे, झोपलेल्यांना जागे करू शकतो, पण जे जागे असूनही झोपेचे सोंग घेतात त्यांना जागे करता येणार नाही, असे सूचक वक्तव्य माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शनिवारी येथे केले.

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर तब्बल ४ महिन्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. आरएसएसचे संयुक्त महासचिव मनमोहन वैद्य यांनी लिहिलेल्या 'हम और यह विश्व' या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात धनखड सहभागी झाले आणि त्यांनी विविध विषयांवर परखड भाष्यही केले. यावेळी त्यांनी आपल्या राजीनाम्याबाबतही सूचक विधान केले. मात्र वेळेअभावी आपण खोलात शिरू शकत नाही, असेही ते म्हणाले.

हल्ली लोक नैतिकता आणि अध्यात्मापासून दूर होत चालले आहेत. मी फ्लाइट पकडण्याच्या नादात माझे कर्तव्य विसरू शकत नाही आणि माझा अलीकडचा भूतकाळ याचा पुरावा आहे, असे म्हणत त्यांनी आपल्या राजीनाम्याकडे सूचक इशारा केला. धनखड यांनी यावेळी कोणत्या नरेटिव्हमध्ये न अडकण्याचा इशाराही दिला. नरेटिव्हमध्ये अडकले की बाहेर पडणे अवघड होते. देव करो आणि कुणीही अशा नरेटिव्हमध्ये अडकू नये. कारण एखादी व्यक्ती अशा चक्रव्यूहामध्ये अडकली तर तिचे बाहेर पडणे अवघड आहे. इथे मी स्वतःचे उदाहरण देत नाही. लोक नरेटिव्हचा बळी बनवण्याचा प्रयत्न करतात. याच्याशी एकटी व्यक्ती नाही, पण संस्था लढू शकतात, असेही धनखड म्हणाले.

भारताची रशिया, यूएईकडून तेल खरेदीत मोठी वाढ; होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक पूर्ववत होण्यापूर्वीचा दिलासा

Mumbai : एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भाशय कर्करोगावर नियंत्रण; केईएम रुग्णालयात २८२ लाभार्थ्यांना एचपीव्हीची मात्रा

Mumbai Rain : मेघगर्जनेसह पावसाचे जोरदार पुनरागमन! वांद्रे-वरळीसह अनेक भागांत मुसळधार सरी, ऑरेंज अलर्ट जारी

'मुलगा अडथळा ठरतोय'; प्रियकराच्या सांगण्यावरून आईने घेतला दोन वर्षांच्या चिमुकल्याचा जीव

NEET UG 2026 Re-Exam : फ्लश टँकमध्ये मोबाईल लपवून परीक्षेत कॉपीचा प्रयत्न; १८ वर्षीय विद्यार्थ्याला अटक