श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन विभागात लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. हे दहशतवादी प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरून घुसखोरीचा प्रयत्न करत होते. सीमेपलीकडून गोळीबाराचा धोका लक्षात घेऊन कडक सुरक्षेत दहशतवाद्यांचे मृतदेह बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, मृत दहशतवाद्यांची ओळख व संघटनेची माहिती समोर आलेली नाही. गेल्या ८ दिवसांत लष्कर व दहशतवाद्यांमधील ही दुसरी चकमक आहे. २० सप्टेंबरला उधमपूरला दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत एक जवान शहीद झाला होता.