राष्ट्रीय

जेफ बेझोस बनले जगातील सर्वात श्रीमंत; इलॉन मस्कला टाकले मागे

Swapnil S

मुंबई : ब्लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्सने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, आता ॲमेझॉन कंपनीचे मालक जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. बेझोस यांनी टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांना मागे टाकले आहे.

टेस्ला शेअर्सच्या घसरणीमुळे मस्क यांची एकूण संपत्ती कमी झाली आहे. टेस्लाच्या शेअर्समध्ये ७ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीनुसार, जेफ बेझोसची एकूण संपत्ती आता २०० अब्ज डॉलर (१६.५८ लाख कोटी रुपये) आहे. तर इलॉन मस्कची एकूण संपत्ती १९८ अब्ज डॉलर (१६.४१ लाख कोटी रुपये) आहे. लुई व्हिटॉन मोएट हेनेसी (LVMH) चे सीईओ बर्नार्ड अर्नॉल्ट १९७ अब्ज डॉलर (१६.३३ लाख कोटी रुपये) संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत. त्याचप्रमाणे मार्क झुकेरबर्ग चौथ्या क्रमांकावर आणि मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स पाचव्या स्थानावर असून त्यांची एकूण संपत्ती १५० अब्ज डॉलर्स आहे.

या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी ११५ अब्ज डॉलर्स (९.५३ लाख कोटी रुपये) संपत्तीसह ११ व्या स्थानावर आहेत. तर गौतम अदानी या यादीत १२ व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती १०४ अब्ज डॉलर (८.६२ लाख कोटी रुपये) आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

विभवकुमारने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण; स्वाती मालीवाल यांनी नोंदविला 'एफआयआर'

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

छगन भुजबळ नाराज; प्रचारात फारसे सक्रिय नसल्याने चर्चांना उधाण

सिंचन घोटाळ्यात तथ्य, मात्र अजितदादा दोषी नाहीत - फडणवीस