राष्ट्रीय

ऑगस्टमध्ये जिओने जोडले ३२.८ लाख नवे ग्राहक

वृत्तसंस्था

5G लॉन्च झाल्यानंतर दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स जिओ आणि एअरटेलचे वर्चस्व झपाट्याने वाढत आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)नुसार, जिओने ऑगस्टमध्ये ३२.८ लाख नवीन वापरकर्ते आपल्या नेटवर्कशी जोडले आहेत. यासह, जिओ नेटवर्कच्या वापरकर्त्यांची संख्या ४१.९२ कोटी झाली आहे. यापूर्वी जुलैमध्ये जिओने २९.४ लाख नवीन वापरकर्ते आपल्या नेटवर्कशी जोडले होते.

भारती एअरटेलने ऑगस्टमध्ये ३.२६ लाख नवीन वापरकर्ते जोडले. त्यानंतर एअरटेल यूजर्सची संख्या ३६.३८ कोटी झाली आहे. यापूर्वी जुलैमध्ये ५.१ लाख नवीन वापरकर्ते जोडले गेले होते.

त्याच वेळी, वोडाफोन आयडियाचे वापरकर्ते सतत कमी होत आहेत. वोडाफोन-आयडिया कंपनीच्या १९.५८ लाख वापरकर्त्यांनी ऑगस्टमध्ये नेटवर्क सोडले आहे. यासह, कंपनीच्या एकूण वापरकर्त्यांची संख्या २५.३१ कोटींवर आली आहे.

ऑगस्ट महिन्यात देशातील मोबाइल फोन वापरकर्त्यांच्या संख्येत ०.१२ टक्का वाढ झाली आहे. सध्या देशात सुमारे ११७.५ कोटी मोबाईल फोन वापरकर्ते आहेत. जुलैमध्ये हा आकडा ११७.३ कोटी होता.

वायरलाइन सेवेतही

जिओ नंबर वन

देशातील आघाडीची खाजगी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ ऑगस्टमध्ये सरकारी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ला मागे टाकत देशातील सर्वात मोठी फिक्स्ड-लाइन सेवा प्रदाता बनली. ट्रायच्या म्हणण्यानुसार, जिओच्या वायरलाईन (फिक्स्ड लाइन) ग्राहकांची संख्या ऑगस्टमध्ये ७३.५२ लाखांवर पोहोचली, तर बीएसएनएलच्या वापरकर्त्यांची संख्या ७१.३२ लाख होती. यासह, ऑगस्टमध्ये देशातील वायरलाईन ग्राहकांची संख्या वाढून२.५९ कोटी झाली आहे, जी जुलैमध्ये २.५६ कोटी होती.

या कालावधीत जिओने २.६२ लाख नवीन ग्राहक जोडले, भारती एअरटेलने १.१९ लाख, तर वोडाफोन-आयडिया आणि टाटा टेलिसर्व्हिसेसने या कालावधीत अनुक्रमे ४,२०२ आणि ३,७६९ नवीन ग्राहक जोडले.

ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

धक्कादायक! दहा वर्षाच्या चिमुकल्याचा गळा चिरून मृतदेह खाडीत फेकला, हत्येप्रकरणी वडिलांच्या मित्राला अटक

वांद्रे ते मरीन ड्राईव्ह फक्त १२ मिनिटांत! २.५ हजार मेट्रिक टन वजनाचा गर्डर लाँच

काय सांगता! फक्त ६ लाखांत घरी आणा 'या' जबरदस्त कार, फीचर्सही आहेत दमदार

होर्डिंगचा पाया मजबूत होता का? व्हीजेटीआय करणार ऑडिट; स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचा पालिकेचा आदेश