ईपीएफओअंतर्गत नोंदणीकृत औपचारिक रोजगार निर्मिती जूनमध्ये ८.९ टक्क्यांनी वाढली आहे. जूनमध्ये १.८३ दशलक्ष इतका विक्रमी रोजगार मिळाला आहे. त्यापूर्वी मे महिन्यात १.६८ दशलक्ष लोकांना रोजगार मिळाला होता. ईपीएफओने शनिवारी जारी केलेल्या पेरोल डेटानुसार, जून २०२२मध्ये त्याच्या सदस्यांची संख्या गेल्या वर्षीच्या जूनच्या तुलनेत ०.५५दशलक्षने वाढली आहे.
जूनमध्ये जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ईपीएफओमध्ये सामील झालेल्या एकूण १.८३ दशलक्ष लोकांपैकी सुमारे १.०५ दशलक्ष लोक प्रथमच ईपीएफअंतर्गत सामाजिक सुरक्षा कवचमध्ये सामील झाले. त्याच वेळी, सुमारे ०.७८ दशलक्ष लोक त्यांचे पैसे मागील पीएफ खात्यातून बाहेर पडल्यानंतर चालू पीएफ खात्यात हस्तांतरित करून त्यात पुन्हा सामील झाले. ईपीएफओने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात २२ ते २५ वयोगटातील सर्वाधिक तरुण या सामाजिक सुरक्षा योजनेत सामील झाले. त्यांची संख्या ०.४७ दशलक्ष इतकी होती.
ईपीएफओच्या आकडेवारी-नुसार, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, हरियाणा, गुजरात आणि दिल्ली रोजगार निर्मितीच्या बाबतीत आघाडीवर आहेत. जून महिन्यात या सहा राज्यांमधून सुमारे १.२६ दशलक्ष ग्राहक ईपीएफओमध्ये सामील झाले.
जून महिन्यात सामाजिक सुरक्षा योजनेत सामील झालेल्यांपैकी हा आकडा २२.०९ टक्के आहे.